National Herald Case : सोनिया-राहुल गांधींना ED च्या नोटीस विरोधात काँग्रेसची देशभरात पत्रकार परिषद, निदर्शनाचीही तयारी
National Herald Case : आता या मुद्द्यावर काँग्रेस आज देशभर पत्रकार परिषद घेणार आहे.
National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने (ED) सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अनेकदा समन्स बजावले आहेत. आता या मुद्द्यावर काँग्रेस आज देशभर पत्रकार परिषद घेणार आहे. याशिवाय काँग्रेसने यासाठी ईडी कार्यालयावर निदर्शने आणि मोर्चासह अनेक तयारीही केली आहे. विविध राज्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांवर पत्रकार परिषदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी सर्व काँग्रेस नेते सरकारी यंत्रणांच्या कारवाईसाठी केंद्र सरकारवर हल्लाबोल करणार आहेत.
'या' नेत्यांना आदेश
ईडीच्या समन्सबाबत काँग्रेस नेते सचिन पायलट लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्याशिवाय रायपूरमध्ये विवेक तनखा, सिमल्यात संजय निरुपम, चंदिगडमध्ये रणजीत रंजन, अहमदाबादमध्ये पवन खेडा, डेहराडूनमध्ये अलका लांबा, पाटण्यात नासिर हुसेन, गोव्यात मधु गौर. ज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय नेते पोहोचणार नाहीत, तेथे स्थानिक नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.
ईडी कार्यालयासमोर निदर्शने
याशिवाय सोमवारी काँग्रेस देशभरात निदर्शने करणार आहे. ईडीच्या कारवाईविरोधात ही निदर्शने करण्यात येणार आहे. त्याचवेळी दिल्लीतील पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. आज अलका लांबा डेहराडून येथील स्टेट ऑफिसमध्ये दुपारी 12.15 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नसीर हुसेन राज्य काँग्रेस मुख्यालय सदकत आश्रम पटना येथे दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतील. सचिन पायलट दुपारी 3 वाजता 10-मॉल एव्हेन्यू येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतील.
सुडबुद्धीने हे कृत्य, काँग्रेसचा आरोप
महत्वाच्या इतर बातम्या