Indian Railway News: भारत ते नेपाळ ट्रेनचे वेळापत्रक जाहीर, फक्त 12.50 रुपयांत पोहचाल नेपाळला, जाणून घ्या
Indian Railway News:तब्बल आठ वर्षांनंतर जयनगर ते कुर्था ही लक्झरी रेल्वे सेवा सुरू झाली. जाणून घ्या वेळ, खर्च आणि इतर माहिती
Indian Railway News : भारतातून नेपाळला जायचे असेल तर आता ट्रेन सुरू झाली आहे. एकूण दोन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ही गाडी जयनगर स्थानकातून सकाळी 8.15 आणि दुपारी 2:45 वाजता सुटेल. ही रेल्वे एका दिवसात दोन फेऱ्या करेल. तब्बल आठ वर्षांनंतर जयनगर ते कुर्था ही लक्झरी रेल्वे सेवा सुरू झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी त्याचे उद्घाटन केले.
दररोज 2 अप आणि 2 डाऊन ट्रेन
गेल्या रविवारपासून या मार्गावर सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेचे संचालन सुरू झाले आहे. जयनगर येथून सकाळी 8.15 वाजता आणि दुपारी 2:45 वाजता जनकपूरसाठी गाडी सुटेल. जयनगर ते जनकपूर प्रवास करण्यासाठी एक तास 20 मिनिटे आणि जनकपूरहून जयनगरला जाण्यासाठी एक तास 40 मिनिटे लागतील. डीएमयू एका दिवसात दोन फेऱ्या करेल. त्याच वेळी, जनकपूर येथून सकाळी 11:05 वाजता आणि जयनगरसाठी संध्याकाळी 5:35 वाजता ही ट्रेन सुरू होईल.
नेपाळला जाण्यासाठी 12.50 रुपये खर्च करावे लागतील
जयनगर आणि कुर्था दरम्यान एकूण 7 स्थानके आहेत. जयनगर ते इनरवा 4.5 किमी, जयनगर ते खजुरी 8.6 किमी, जयनगर ते महिनाथपूर 14.15 किमी, जयनगर ते वैदेही 18.53 किमी, जयनगर ते पेरहया 21.6 किमी, जयनगर ते जनकपूर 29.5 किमी आणि जयनगर ते जनकपूर 29.5 किमी आणि जयनगर ते 34 किमी. रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर भारतातून नेपाळला जाण्यासाठी केवळ 12.50 रुपये खर्च करावे लागतील. जयनगर ते इनरवाचे भाडे रु. 12.50 आहे. दुसरीकडे, खजुरीला जाण्यासाठी 15.60 रुपये, महिनाथपूरला जाण्यासाठी 21.87 रुपये, वैदेहीला जाण्यासाठी 28.12 रुपये, 34.00 रुपये, जनकपूरला 43.75 रुपये आणि कुर्थाला जाण्यासाठी 56.25 रुपये मोजावे लागतील.
इतर महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Petrol-Diesel Price : महंगाई डायन खाए... महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल 120 रुपयांवर, इतर शहरांतील दर काय?
- Coronavirus Cases Today : सुमारे दोन वर्षानंतर कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या खाली गेल्या 24 तासात 913 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू