एक्स्प्लोर

Weather protection :  2030 पर्यंत भारत हरितगृह वायू उत्सर्जन एक अब्ज टन कमी करणार,  मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

भारत 2030 पर्यंत एकूण हरितगृह वायू उत्सर्जन (GHGS) एक अब्ज टन कमी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले .

Weather protection : भारत 2030 पर्यंत एकूण हरितगृह वायू उत्सर्जन (GHGS) एक अब्ज टन कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व 2030 मध्ये एकूण वापराच्या 50 टक्क्यांनी कमी करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह (Dr Jitendra Singh) यांनी दिली. हवामान संरक्षणासाठीचा भारताचा पथदर्शी आराखडा त्यांनी सामायिक केला, त्यावेळी सिंह बोलत होते. 'एकीकृत धोरण निर्मितीसाठी व्यवस्थेचे विश्लेषण' या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी जितेंद्र सिंह बोलत होते.

कार्बनची तीव्रता 2005 च्या पातळीपेक्षा जीडीपीच्या प्रमाणात  45 टक्क्यांनी कमी करणे. तसेच   2070 पर्यंत संपूर्ण देश कार्बन तटस्थ करणे यासाठी भारत कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक स्तरावर या समस्येचे निराकरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख भूमिका बजावत असल्याचेही ते म्हणाले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स ॲनालिसिसच्या (आयआयएएसए) सहकार्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत (डीएसटी) स्वायत्त संस्था, टेक्नॉलॉजी इन्फॉरमेशन, फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौसिंलने (तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि मूल्यांकन परिषदेने, टीआयएफएसी) या परिषदेचे आयोजन केले आहे. यात सुमारे 1000 शिक्षणतज्ञ, संशोधक, अभ्यासक, सरकारी अधिकारी, आयआयएएसए प्रतिनिधी, विविध विषयांतील धोरणकर्ते सहभागी झाले आहेत. हवामान बदल, प्रदूषण, स्वच्छ ऊर्जा, उपजीविका आणि डिजिटलायझेशन यासह आशियातील देशांनी व्यापकपणे सामायिक केलेल्या समस्यांवर ते मंथन करत आहेत.

पूर, दुष्काळ, चक्रीवादळाला  हवामान बदल कारणीभूत

मलेशिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, इराण, फिलीपिन्स, जपान आणि जॉर्डनमधील तज्ज्ञांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. विविध भागधारकांमधील व्यापक परस्परसंवाद केंद्रित  प्रणाली विश्लेषण साधनांचा बहुपक्षीय अनुप्रयोग करत उपाय शोधत आहेत. भारत आपल्या विशेष भौगोलिक-हवामानाच्या परिस्थितीमुळे नेहमी नैसर्गिक आपत्तींचा बळी ठरतो असे मत यावेळी जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप आणि भूस्खलन या वारंवार घडणाऱ्या घटना आहेत. परंतू, अलीकडच्या काळात घटनांच्या वारंवारता आणि तीव्रतेची अनिश्चितता वाढली आहे. हवामान बदल याला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आपत्ती व्यवस्थापनात अग्रेसर असल्याने हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जग आपल्याकडे अपेक्षेने पाहत असल्याचेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

यावर्षी भारतच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त या अत्यंत महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करणे हा भारतासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget