27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार, दिल्लीकरांना केजरीवालांचा वाईट अनुभव : गिरीश महाजन
दिल्लीच्या निकालावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे, हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
Girish Mahajan on Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Election Results 2025) मतमोजणी सध्या सुरु आहे. या मतमोजणीनूसार भाजपाने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे. आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दरम्यान, याच निकालावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री (BJP CM) होणार आहे, हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. 27 वर्षापासून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापासून व सत्तेपासून आम्ही दूर होतो, मात्र यावेळी जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला असल्याचे महाजन म्हणाले.
70 पैकी भाजपला 40 च्या वर जागा मिळाल्या
दिल्लीच्या जनतेने 70 पैकी 40 च्या वर जागा भाजपच्या निवडून दिल्या आहेत. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व राजकारणाचे मुख्य केंद्र आहे. दिल्लीच्या विजयामुळे संपूर्ण देशात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साहाची लाट आली असल्याचे महाजन म्हणाले. सर्व दिल्लीकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो असेही महाजन म्हणाले. गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी यांची सत्ता दिल्लीमध्ये होती.
दिल्लीकरांना अरविंद केजरीवालांचा वाईट अनुभव आला
लोकांना सर्व मोफत अशा भूल ताफा द्यायच्या मात्र प्रत्यक्षात या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला होत असेही महाजन म्हणाले. त्यामुळे केजरीवालांना यावेळी दिल्लीत हार पत्करावी लागल्याचे महाजन म्हणाले. दिल्लीतील विजयाचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश अतिशय पुढे चालला आहे. म्हणून जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर आहे असंही महाजन म्हणाले.
अरविंद केजरीवालांसह मनिष सिसोदि यांचाही पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

