Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Faridabad Rain: रेल्वे अंडरपास ब्रीजखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते, या पाण्याची पातळी साधारण 10 फूट एवढी होती.

Faridabad Rain: हरियाणा : हरियाणातील फरीदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील अनेक भागात पाणीच पाणी अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. फरीदाबादमधील रेल्वे अंडर ब्रीज परिसरात 10 फूट पाणी साचलं होतं. येथील पुलाखाली पाणी साचल्यामुळे पुलाखालूनची सर्वच वाहतूक बंद झाली होती. मात्र, पुलाखाली साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गुरुग्राम येथील एचडीएफसी बँकेच्या (Bank) मॅनेजरने आपली कार पाण्यात घातली. मात्र, पाण्याचा अंदान न आल्याने शॉर्टकट मारण्यासाठी घातलेली कार पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत (Accident) कारमधील दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. XUV700 या कारमधून बँकेचे मॅनेजर आणि कॅशियर असे दोघे प्रवास करत होते.
रेल्वे अंडरपास ब्रीजखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते, या पाण्याची पातळी साधारण 10 फूट एवढी होती. कार पाण्यात जाताच ऑटोमॅटिकपणे लॉक झाली, व पाण्यात बुडाली. त्यामुळे, कारमधून बाहेर निघणे बँक मॅनेजर आणि कॅशियरला शक्य झालं नाही. त्यात, कारमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. बँकेतील कर्मचारी आदित्य यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गुरुग्राम सेक्टर 31 मधील एचडीएफसी बँके शाखेत विराज द्विवेदी हे कॅशियर म्हणून कार्यरत होते. तर, पुण्य श्रेय शर्मा हे बँकेत मॅनेजर होते. यापूर्वी ते यूनियन बँकेचे प्रधानही राहिले आहेत. द्विवेदी हे बँक मॅनेजरला त्यांच्या कारमधून घरी सोडविण्यासाठी जात होते. यादरम्यान ते गुरुग्राम ते फरीदाबाद असा प्रवास करत असताना ओल्ड फरीदाबाद रेल्वे अंडर ब्रीजजवळ आल्यानंतर त्यांना पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.
कारमध्ये बसलेल्या दोघांनाही पुलाखाली पाण्याचा अंदाज न आल्याने त्यानी पाण्यात कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, पाण्यात कार गेल्यानंतर ती बाहेर काढणे शक्य न झाल्याने कारसह पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे बँक मनेजर शर्मा यांच्या घरी मुक्काम करुन द्विवेदी ही सकाळी दिल्लीसाठी रवाना होणार होते. मात्र, रात्रीच अशी अपघाताची घटना घडल्याने दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
फोन बंद, पोलिसांकडून समजली घटना
दरम्यान, बँकेतील कर्मचारी आदित्य यांनी बँक मनेजर आणि कॅशियर यांना फोन केला होता. मात्र, दोघांनीही फोन न उचलल्यामुळे त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यानंतर, बँकेतील कर्मचारी आणि कुटुंबीयांकडून या दोघांचा संबंधित मार्गावर फरीदाबाद येथे शोध घेण्यात येऊ लागला. तसेच, पोलिसांकडे जाऊन माहिती दिल्यानंतर एका गाडी पुलाखाली पाण्यात बुडाल्याचे त्यांना समजले. तसेच, या दुर्दैवी घटनेत कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याचंही पोलिसांनी त्यांना सांगितलं. तेव्हा, मोठी दुर्घटना घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
हेही वाचा
Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

