एक्स्प्लोर

मोठी बातमी : WazirX वर हॅकर्सचा हल्ला, 1900 कोटीची क्रिप्टो करन्सी उडवली, तुमची गुंतवणूक किती सुरक्षित?

वझिर एक्स या क्रिप्टोकरन्सी फर्मवर मोठा सहायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हॅकर्सने गुंतवणूकदारांचे लाखो डॉलर्स पळवले आहेत.

नवी दिल्ली : वझिर एक्स (WazirX) या भारतीय क्रिप्‍टोकरन्सी एक्‍स्चेंजवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वझीर-एक्सवर या मंचावरील एका व्हॉलेटमधून हॅकर्सने साधारण 23 कोटी डॉलर्स म्हणजेच 1923 कोटी डिजिटल रुपये चोरले आहेत. कंपनीनेदेखील या चोरीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सायबर हल्ल्याच्या मागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याचे बोलले जात आहे.

पैसे काढण्यावर तात्पुरती बंधनं 

या चोरीबद्दल वझीरएक्सने समाजमाध्यमावर माहिती दिली आहे. "आमच्या मल्टिसिग व्हॉलेटमधील एक सुरक्षा व्यवस्थेला तोडण्यात आलंय. आमची टीम या घटनेची चौकशी करत आहे. गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी सध्या भारतीय रुपया आणि क्रिप्टो करन्सी काढून घेण्याची प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात येईल. तुमच्या धिराबद्दल तसेच ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही तुम्हाला याबाबतच्या अपडेट्स देत राहू," असे कंपनीने समाजमाध्यमावर स्पष्ट केले आहे.

लिमिनल कस्टडीच्या अखत्यारितील सर्व खाती सुरक्षित

हा प्रकार समोर आल्यानंतर क्रिप्टो स्टोअरेज प्रोव्हाईडर लिमिनल कस्टडीनीही स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही सुरक्षेचा भंग झालेला नाही. ज्या वॉलेट्सवर सायबर हल्ला करण्यात आला, ते वॉलेट्स लिमिनल कस्टडी इकोसिस्टिमच्या बाहेर होते. म्हणजेच लिमिनल प्लॅटफॉर्मवर असलेले वझीरएक्सचे सर्व वॉलेट्स सुरक्षित आहेत, असे लिमिनल कस्टडीने सांगितलंय.

भारतीय क्रिप्टो जगताला झटका 

दरम्यान, वझीरएक्सवर झालेला हा हल्ला भारतातील क्रिप्टो उद्योगासाठी मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही काळात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्य वाढले आहे. असे असताना हा सायबर हल्ला या क्षेत्रासाठी मोठा धाक्का असल्याचे समजले जातेय. यावरच CoinDCX चे सहसंस्थआपक नीरज खंडेलवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भारतीय बाजारात वझीरएक्स हा आमचा प्रतिस्पर्धी आहे. पण ही घटना समजल्यावर मला दु:ख झालं. भारतीय वेब इकोसिस्टिमसाठी ही चांगली बातमी नाही," असे खंडेलवाल म्हणाले.

हेही वाचा :

लाडक्या भावांना बारावी अन् पदवीनंतर दोनदा योजनेचे पैसे मिळणार का? नेमका अर्ज कुठं करायचा, युवकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Microsoft Faces Global Outage : मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित; काही रद्द, काही विलंबाने; बुकिंग आणि चेक-इन देखील होईना

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Embed widget