एक्स्प्लोर

Coronavirus | देशात 4789 कोरोना बाधित, तर 124 लोकांचा मृत्यू; 353 रूग्ण कोरोनामुक्त

देशात कोरोना फोफावत चालला असून कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत.

नवी दिल्ली : देशामध्ये COVID-19 चा संसर्ग झालेल्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंतचे आकडे जारी केले. त्यानुसार, आतापर्यंत 4789 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 124 लोकांचा मृत्यू झाला आहे. 353 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर जगभरात 75,000 पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू युरोपात झाले आहेत.

राज्यानुसार कोरोनाग्रस्तांची संख्या

राज्यांबाबत बोलायचे झाले तर देशभरातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. येथे 868 लोक करोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 56 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. तर 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशमध्ये 266, अंदमान निकोबारमध्ये 10, अरूणाचल प्रदेशमध्ये एक, आसाममध्ये 26, बिहारमध्ये 32, चंदिगढमध्ये 18, छत्तीसगढमध्ये 10, दिल्लीमध्ये 576, गोव्यात 7, गुजरातमध्ये 165, हरियाणामध्ये 90, हिमाचल प्रदेशमध्ये 13, जम्मू-काश्मिरमध्ये 116, झारखंडमध्ये 4, कर्नाटकात 175, केरळमध्ये 327, लदाखमध्ये 14, मध्यप्रदेशात 229, मणिपूर मध्ये दोन, मिझोरम मध्ये एक, ओदिशामध्ये 42, पद्दुचेरीमध्ये पाच, पंजाबमध्ये 91, राजस्थानमध्ये 288, तामिळनाडूमध्ये 621, तेलंगणामध्ये 364, त्रिपुरामध्ये एक, उत्तराखंडमध्ये 31, उत्तरप्रदेशमध्ये 305 आणि पश्चिम बंगालमध्ये 91 रूग्ण कोरोना बाधित आहेत.

पाहा व्हिडीओ : कोरोनावरील लस तयार केल्याचा केडिला हेल्थकेअरचा दावा, सध्या प्राण्यांवर चाचणी सुरू

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, 'संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्याती असे रूग्ण ज्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यासाठी ‘कोविड-19 केयर सेंटर’ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये संसर्ग झाल्याचा संशय असणाऱ्या रूग्णांनाही ठेवण्यात येईल. हे सेंटर सरकारी इमारती, हॉटेल्स, लॉज यांसारख्या ठिकाणी तयार करण्यात येतील. ज्यांना COVID-19 रूग्णालयांशी जोडण्यात आलं आहे. गरज भासल्यास या रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात येईल.

अग्रवाल यांनी बोलताना सांगितले की, दुसऱअया टप्प्यात अशा रूग्णांचा समावेश करण्यात आलं आहे, जे आधीपासूनच डायबिटीज किंवा हृदयरोगासह इतर आजारांनी पीडित आहेत. किंवा संसर्गामुळे ज्यांची प्रकृती गंभीर आहे. यांच्यासाठी ‘डेडीकेटिड कोविड-19 हेल्थ सेंटर' तयार करण्यात येणार आहे. हे सेंटर्स रूग्णालयातच तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये ऑक्सिजनसह इतर आवश्यक गोष्टिंची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

'लॉकडाऊनचं पालन करा'

अग्रवाल यांनी कोरोनावरील एका संशोधच्या रिपोर्टचा हवाल्याने लॉकडाऊन या संकटाचा प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाचा एक रूग्ण दुसऱ्या रूग्णाच्या संपर्कात येण्या संदर्भात करण्यात आलेल्या या संशोधनात सांगण्यात आलं आहे की, लॉकडाऊनचं पालन न केल्याने एक कोरोना बाधित व्यक्ती 30 दिवसांत 406 लोकांना बाधित करू शकते. त्यामुळे लॉकडाऊनचं 75 टक्क्यांपर्यंत पालन झाल्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे फक्त 2.5 लोकांपर्यंत संसर्ग होतो. त्यामुळे मी देशातील जनतेला लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन करतो.

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या पंतप्रधानांना सूचना; मीडियाच्या जाहिराती बंद करण्याच सल्ला, एनबीएची नाराजी

Coronavirus Vaccine | कॅडिला कंपनीचा कोरोना लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
Income Tax : प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरुन 12 लाख का केली? निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितलं
करमुक्त उत्पन्न 7 लाखांवरुन 12 लाख केलं, किती करदात्यांना लाभ होणार, निर्मला सीतारामन यांनी आकडेवारी सांगितली
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणारMaitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध :  02 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines  : सकाळी ८ च्या हेडलाईन्स :  02 February 2024 : ABP MajhaSanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल
Income Tax : प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरुन 12 लाख का केली? निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितलं
करमुक्त उत्पन्न 7 लाखांवरुन 12 लाख केलं, किती करदात्यांना लाभ होणार, निर्मला सीतारामन यांनी आकडेवारी सांगितली
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
Embed widget