(Source: ECI/ABP News/ABP Majha)
I Salute Her... सैन्यात भरती झालेल्या वीर जवानाच्या पत्नीचे आनंद महिद्रांनी केले अभिनंदन
Wife of Galwan hero joins Indian Army: गलवानमध्ये शहीद झालेले नाईक दीपक सिंह यांच्या पत्नी आता सैन्यात रुजू झाल्या आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक करत आनंद महिंद्रा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Wife of Galwan hero joins Indian Army: भारतात देशसेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे अनेक शूरवीर आहेत. त्यांनी दिलेले बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी तितकच महत्त्वाचं आहे. पण आता या शहीद जवानांचे कुटुंबदेखील आता देशसेवेसाठी तयार झाले आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातमध्ये चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्काराचे जवान शहीद झाले. या 20 शूरांपैकी एकाच्या पत्नीने आता भारतीय सैन्यात आपले कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा सिंह यांची शनिवारी भारतीय सैन्यात(Indian Army) लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. पूर्व लडाखमध्ये जिथे भारत आणि चीनचे जवळजवळ तीन वर्षांपासून संबंध बिघडत चालले आहेत अशा भागात त्यांचे पोस्टिंग झाले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक उद्योजक आनंद महिंद्रा (Ananad Mahindra) यांनी केले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत त्यांचे अभिनंदन देखील केले आहे.
आनंद महिंद्रा यांचे ट्वीट
आनंद महिंद्रांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, म्हणूनच देशातील जवानांना कोणाही कमी लेखू नये, त्यांच्या देशप्रमाची बांधिलकी ही त्यांच्या कुंटुंबामध्ये देखील आहे. तसेच या महिलांचे अभिनंदन करत 'मी तिला सलाम करतो' असे आनंद महिद्रांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
महिला कॅडेट रेखा सिंह, दिवंगत नाईक दीपक सिंह यांच्या पत्नी आहेत. दीपक सिंह यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही माहिती भारतीय लष्कराने ट्वीट करत दिली आहे.
भारतीय लष्कारच्या माहितीनुसार, चीनचे भारतीय सैन्यापेक्षा दुप्पट सैनिक मारले गेले होते. परंतु चीनने त्यांचे केवळ चार चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता. भारतीय लष्कर सैन्य अधिकारी बनण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना त्यांच्या दिवंगत पतीच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तसेच त्यांना नवीन सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन देखील करत आहे. आता लष्करामध्ये महिलांवर पुरुषांच्या बरोबरीने जबाबदारीच्या भूमिका सोपवण्यात आल्या आहेत. लष्करासह, भारतीय सीमा सुरक्षा दलातही महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.
#Proud #VeerNari
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 29, 2023
Woman Cadet Rekha Singh, wife of Late Naik(Nursing Assistant) Deepak Singh, #VirChakra(Posthumous) got commissioned into #IndianArmy after completing her training from #OTA #Chennai. Nk Deepak made the supreme sacrifice during the #Galwan Clashes. pic.twitter.com/zzI3tCnBZj