एक्स्प्लोर

Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो

A Lamborghini car crushed several laborers : व्हिडिओमध्ये दिसत आहे की जेव्हा लोक आरोपी कार ड्रायव्हरकडे जातात तेव्हा तो कारमधून विचारतो, कोणी मेले आहे का? हे ऐकून लोक संतापले. 

A Lamborghini car crushed several laborers : नोएडामध्ये एका लॅम्बोर्गिनी कारने फूटपाथवर बसलेल्या अनेक मजुरांना चिरडले. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. जेव्हा लोक गाडीजवळ धावत आले तेव्हा ड्रायव्हरने विचारत म्हणाला की, कोणी मेलं आहे का? मग तो हळूच गाडीतून बाहेर आला. म्हणाला की, मी हलकी रेस केली होती, गाडी अचानक पुढे जाऊ लागली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कामगारांना रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी चालकाला अटक केली असून कार जप्त केली आहे. गाडी दुसऱ्याची होती, तरुण टेस्ट ड्राईव्हसाठी बाहेर गेला होता.

कोणी मेले आहे का? हे ऐकून लोक संतापले

सेक्टर-126 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 94 मधील चरखा फेरीजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की जेव्हा लोक आरोपी कार ड्रायव्हरकडे जातात तेव्हा तो कारमधून विचारतो, कोणी मेले आहे का? हे ऐकून लोक संतापले. 

कामगार फूटपाथवर बसले होते

रविदास आणि रंभू कुमार हे दोन मजूर चरखा फेरीजवळील फूटपाथवर बसले होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेली लॅम्बोर्गिनी त्यांच्या अंगावर धावून फूटपाथवर चढली आणि झाडाला धडकली. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या दीपक कुमारला अटक केली आहे. तो अजमेरचा रहिवासी आहे. त्याने सांगितले की कार त्याची नाही. कारचा मालक मृदुल हा सुपरनोव्हा येथील रहिवासी आहे.

आरोपी हा कार दलाल

दीपकने सांगितले की, त्याने गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी घेतली होती. तो दलाल म्हणून काम करतो. तो लक्झरी कार खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करणारा आहे. ते तपासण्यासाठी तो गाडी चालवत होता. गाडीच्या स्क्रीनवर काही त्रुटी दिसत होत्या, जी तपासण्यासाठी तो चालवत होता. त्यानंतर हा अपघात झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी; पती-पत्नी, भाऊ-भावजय, मेव्हणा, भाचाही मैदानात
घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी; पती-पत्नी, भाऊ-भावजय, मेव्हणा, भाचाही मैदानात
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget