आधुनिक लखोबा! पहिली सोडली, दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहत असतानाच तिसरी जाळ्यात ओढली
Chhatrapati Sambhaji Nagar : शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) या आधुनिक लखोबाला शोधून बेड्या ठोकल्या आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : पहिली बायको असताना तिला सोडून दुसऱ्यासोबत राहत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील समोर आले आहेत. पण छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एक 41 वर्षीय आधुनिक लखोबाने त्यापुढे जाऊन 'पराक्रम' केला आहे. लग्नाची पहिली बायको चार मुलांसह सोडून गेल्याने त्याने दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिच्यापासून एक मुलगी झाली. पण हा बाबा एवढ्यावरच थांबला नाही. घरातून रुसून आलेल्या बायकोच्या अल्पवयीन मैत्रिणीलाही त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे तिला देखील कुमारी माता बनवली. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) या आधुनिक लखोबा लोखंडेस शोधून बेड्या ठोकल्या आहे. सुभाष फकिरा राठोड (वय 41, रा. ह.मु.इंदिरानगर) असे या आधुनिक लखोबा आरोपीचे नाव आहे.
मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवणाऱ्या सुभाष राठोड आपल्या पत्नीसह चार मुलांसोबत राहायचा. दरम्यानच्या काळात त्याने पहिल्या पत्नीसह चार मुलांना सोडून दिले. पहिल्या पत्नीला सोडल्यावर त्याचे दुसरीसोबत सूत जुळले. त्यामुळे तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. काही दिवसांनी तिलाही एक मुलगी झाली. याच दरम्यान राठोडच्या बायकोची मैत्रीण असलेली एक अल्पवयीन तरुणी आजीच्या त्रासाला कंटाळून घर सोडून आधारासाठी तिच्याकडे आली. आता एवढे कमी होते की काय, त्याने तिलाही जाळ्यात ओढले. जाळ्यात असे ओढले, की तो शहराबाहेर जाऊन तिच्यासोबतच राहू लागला. तिलाही एक मुलगा झाला.
अल्पवयीन मुलीला पाच महिन्यांचा मुलगा...
अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर याप्रकरणी मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे गुन्ह्याचा तपास 16 जून 2022 रोजी एएचटीयूकडे सोपवण्यात आले. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलीला येत्या 5 मे रोजी 18 वर्षे पूर्ण होत असून, राठोडने मुलीला पळविले तेव्हा तिचे वय 16 वर्षे होते. तर एएचटीयू पथकाने बारकाईने तपास करीत मुलीचा शोध घेत, राठोड यास बेड्या ठोकल्या आहे. तर राठोडपासून अल्पवयीन मुलीला एक मुलगा झाला असून, सध्या तो पाच महिन्यांचा आहे. तर आरोपी राठोडला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तेव्हा त्याला 6 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
