एक्स्प्लोर

अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताना उग्र परफ्यूम, लाल रंगाचे कपडे‎ टाळा; अन्यथा होऊ शकतो मधमाशांचा हल्ला

Bees Attack : अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताना उग्र परफ्यूम आणि लाल रंगाचे कपडे‎ टाळा असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. 

Bees Attack In Ajanta-Ellora Caves : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी (Ajanta-Ellora Caves) पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फक्त भारतच नव्हे तर जगभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र मागील काही दिवसांत अजिंठा आणि वेरूळ लेणीत मधमाशांकडून पर्यटकांवर हल्ला केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताना उग्र परफ्यूम आणि लाल रंगाचे कपडे‎ टाळा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. 

संभाजीनगर‎ अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये सध्या मधमाशांकडून होणाऱ्या हल्ल्याची भीती पाहायला मिळत आहे. वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणीत मोठ्या‎ प्रमाणात मोहोळ असून, त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, यासाठी उग्र परफ्यूम आणि लाल रंगाचे कपडे‎ कारणीभूत ठरत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या लेणी पाहायला जाताना या गोष्टी टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

यामुळे मधमाशांकडून होतो हल्ला? 

सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले असून, मधमाशांना आपली पोळी‎ थंड ठेवण्यासाठी थंड हवेची गरज असते. त्यामुळे अनेक मोहळं लेणीच्या आता आसरा घेतात. उष्णतेचे प्रमाण वाढल्यास ते‎ मधमाशांना सहन होत नाही. अशात काही पर्यटक वेगवेगळ्या ‎प्रकारचे परफ्यूम लावून येतात. विशेष म्हणजे अशाच काही मिथिलिन‎ क्लोराइड आणि फेरॅान मिश्रित उग्र‎ परफ्यूममुळे मधमाशा आक्रमक होतात.‎ तसेच या मधमाशांना लाल रंगाचा देखील राग असतो.‎ विशेष म्हणजे तापमान 34 अंश सेल्सियसपेक्षा अधिक‎ वाढल्यास मिथिलिन क्लोराइड आणि फेरॅान‎ या रसायनांचा गंध अधिक उग्र होतो. तर मिथिलिन क्लोराइड आणि फेरॅान‎ या रसायनांचा गंध अधिक उग्र झाल्यास माणसांप्रमाणे मधमाशांना देखील त्याचा‎ त्रास होतो. त्यामुळेच त्या माणसांवर हल्ला करतात. सोबतच गुटखा,‎ सिगारेटच्या धुराचा देखील मधमाशांना त्रास होतो. त्यामुळे वेरूळ लेणी‎ आणि अजिंठा लेणी परिसरातील एक किलो‎ मीटर अंतरावर वरील गोष्टींचा वापर करून‎ पर्यटकांनी टाळावे असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. 

मधमाशांच्या हल्ल्याच्या दोन घटना 

काही दिवसांपूर्वी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला होता. ज्यात 20 पर्यटक आणि 6  कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान याच घटनेपूर्वी 9 एप्रिल रोजी वेरूळ लेणीच्या 16 क्रमांकाची कैलास लेणी पाहताना पर्यटकांवर आग्यामोहोळाच्या माशांनी हल्ला केला होता. तर या हल्ल्यात देखील 16 पर्यटक जखमी झाले होते. काही जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bees Attack: वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; 15 ते 20 जण जखमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Dharmendra Cremation: कडेकोट बंदोबस्तात धर्मेंद्र यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार; 'या' स्टार किडलाही गेटवर अडवलं, अखेर फोनवर बोलून आत सोडलं
कडेकोट बंदोबस्तात धर्मेंद्रंवर करण्यात आले अंत्यसंस्कार; 'या' स्टार किडलाही गेटवर अडवलं अन्...
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Embed widget