एक्स्प्लोर

शिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या

Aurangabad: मराठवाड्यात यंदा सर्वाधिक 249 आत्महत्यांच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत.

Marathwada Farmer Suicide: मराठवाड्यात शेती पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा यासह इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांतच मराठवाड्यातील तब्बल 939 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविली आहे. तर गतवर्षाअखेर ही आकडेवारी 887  एवढी होती. परंतु हा आकडा यंदा नोव्हेंबरमध्येच पार झाला आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच खरीप आणि रब्बी हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदाही विभागात 11  महिन्यांत विभागात 939 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गतवर्षी डिसेंबरअखेर विभागात 887 आत्महत्या होत्या. त्याअगोदर 2020 मध्ये 773 आत्महत्या होत्या. परंतु यावर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत प्रचंड वाढ झाली आहे. मराठवाड्यात यंदा सर्वाधिक 249 आत्महत्यांच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. तर 939 पैकी 722 आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर 123 आत्महत्या अपात्र ठरल्या असून, उर्वरित 94  प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

शिंदे फडणवीस सरकारमध्ये 475 शेतकऱ्यांची आत्महत्या 

गेल्या अकरा महिन्यात मराठवाड्यातील तब्बल 939 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली असून, यातील 475 शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आत्महत्या केल्या आहेत. ज्यात जुलै महिन्यात 83 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, ऑगस्ट महिन्यात 123, सप्टेंबर 96, अक्टोबर 94 आणि नोव्हेंबर महिन्यात 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

आत्महत्या आकडेवारी (जानेवारी ते नोव्हेंबर 2022 पर्यंत)

महिना  आत्महत्या संख्या  पात्र  अपात्र 
जानेवारी  59 52 7
फेब्रुवारी  73 63 10
मार्च  101 89 12
एप्रिल  47 38 9
मे  76 69 6
जून  108 84 21
जुलै  83 63 17
ऑगस्ट  123 90 26
सप्टेंबर  96 73 10
अक्टोबर  94 69 3
नोव्हेंबर  79 32 2
एकूण  939 722 123

कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या...( 11 महिन्यातील आकडेवारी)

मराठवाड्यात यंदा सर्वाधिक 249  शेतकरी आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद 161, जालना 115, नांदेड 140, उस्मानाबादेत 107, परभणी 67, लातूर 59 आणि हिंगोली जिल्ह्यातील 41 शेतकरी आत्महत्याच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget