मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
ईडीने त्या चार प्रिंटींग प्रेसवरही छापेमारी केली आहे, जिथे हे लॉटरी तिकीट छापण्यात येत होते. लॉटरी मार्केटमध्ये बेकायदेशीर मार्गाने दुसऱ्या व्यक्तींना ते ऑपरेट केले जाऊ देत नव्हते.
नवी दिल्ली: लॉटरी तिकीटशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी तक्रारीवरुन ईडीने (ED) आज विविध राज्यातील 22 ठिकाणी छापा टाकून मोठी रक्कम हस्तगत केलीय. मेघालय स्टेट लॉटरीचे (Meghalay) डायरेक्टर यांनी केलेल्या तक्रारीवरुन मेघालाय पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास सुरू केला होता. ईडीने सँटियागो मार्टिन, आणि त्यांच्या नेतृत्वातील मेसर्स फ्यूचर गेमिंग अँड हॉटेलविरुद्ध तपासाच्या अनुषंगाने पीएमएलए 2002 अनुसार तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाब राज्यातील 22 ठिकाणांवर छापा टाकण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
ईडीने त्या चार प्रिंटींग प्रेसवरही छापेमारी केली आहे, जिथे हे लॉटरी तिकीट छापण्यात येत होते. लॉटरी मार्केटमध्ये बेकायदेशीर मार्गाने दुसऱ्या व्यक्तींना ते ऑपरेट केले जाऊ देत नव्हते. तसेच, नकली लॉटरीचे तिकीटही विक्री केला जात होते. याशिवाय विजयी तिकीटदारांच्या बक्षीस योजनेतही घपळा केला जात होता. मोठ्या संख्येने रोख स्वरुपात तिकीटांची खरेदी करुन काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा केला जात असल्यचंही ईडीच्या तपासातून समोर आलंय. दरम्यान, ईडीकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई असून लॉटरीच्या तिकीटांची अशाप्रकारे ब्लॅकने विक्री होत असल्याचं हे प्रकरण समोर आल्याने लॉटरी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ED has conducted search operations at 22 premises in the States of Tamil Nadu, West Bengal, Karnataka, Uttar Pradesh, Meghalaya and Punjab under the provisions of PMLA, 2002 in connection with investigation against Santiago Martin and his entity M/s Future Gaming and Hotel… pic.twitter.com/QETk5MgYXK
— ED (@dir_ed) November 18, 2024
ईडीने तब्बल 622 कोटींची प्रॉपर्टी केली जप्त
ईडीच्या तपासात एक बाब समोर आली आहे, 90 टक्के लॉटरीचे तिकीट हे 6 रुपयांच्या फेस व्हॅल्यूने विकण्यात आले. त्यामध्ये, विजेता रक्कम 10 हजार रुपयांपेक्षा कमी होती. याशिवाय त्यावरही टॅक्सही नव्हता. मॉर्निट सेंटियागो आणि त्यांच्या कंपनीने लॉटरीच्या या व्यवसायात 920 कोटी रुपयांचा काळा पैसा जमा केलाय. त्यापैकी, 622 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.
ईडीकडून मनी लाँड्रिंगप्रकरणात नव्याने छापेमारी
ईडीने गुरुवारी 15 नोव्हेंबर रोजी चेन्नई सेंटियागो मार्टिनविरुद्ध मोठी कारवाई करत देशभरातील त्यांच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. विशेष म्हणजे राजकीय पक्षांना 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी ( फंड) देणारा सेंटियागो मार्टीन उद्योजक आहे. दरम्यान, ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली आहे.
हेही वाचा
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?