Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
"काही लोक म्हणतात अटक होणार होती, काही म्हणतात ईडी आणि सीबीआयची नोटीस आली होती. म्हणून त्यांनी शरद पवारांना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. मात्र मी यापूर्वी सांगितलेलं आहे. मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणी त्या संदर्भातील पुरावा आज रात्री नऊ वाजेपर्यंत आणून द्यावा, मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेतो", असं चॅलेंज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे. ते आंबेगाव येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलीप वळसे पाटील काय काय म्हणाले? मी नार्को टेस्टला तयार आहे., त्यांची नार्को टेस्ट केली तर देवदत्त निकमांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. विरोधक म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, बिनधास्त करा. पण माझी ही करा अन देवदत्त निकमांची ही नार्को टेस्ट करा. माझ्या नार्को टेस्टमध्ये काय बाहेर पडेल याची मला कल्पना आहे, पण तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.