CM Eknath Shinde: 'या' दहा कारणांमुळे गाजला मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा
Aurangabad: मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे हा दौरा चांगला चर्चेत आला आहे.
CM Eknath Shinde In Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी औरंगाबादचा दौरा केला. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अनेक कारणांनी गाजला आहे. याच दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणला जाहीर सभा घेतली. याच सभेतून त्यांनी विरोधकांवर टीकाही केली. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे हा दौरा चांगला चर्चेत आला आहे.
यामुळे गाजला मुख्यमंत्र्यांचा दौरा
- मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच पैठण दौऱ्यावर आले होते.
- ज्या ठिकाणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी रॅली काढली त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनीही रॅली काढली.
- पैठणच्या ज्या कावसान मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतली होती, त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली.
- मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन लोक बोलवण्यात आल्याचा आरोप झाला.
- मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सभेस्थळी हजर राहण्याचे आदेश काढण्यात आल्याचा आरोप झाला.
- याच सभेत मुख्यमंत्र्यांच्या पेढे तुलासाठी 1 क्विंटल 10 किलो पेढे बनवण्यात आले.
- मुख्यमंत्र्यांनी पेढे तुला नाकरल्यानंतर नागरिकांकडून पेढ्यांची पळवापळवी.
- मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी एसटी बसचा मार्ग बदलण्यात आला.
- मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत कायदे पायदळी तुडवत डीजे वाजवण्यात आला.
- मुख्यमंत्र्यांनी रॅली काढलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून रस्त्याचं शुध्दीकरण केलं.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी मंत्र्यांची मोठ्याप्रमाणात हजेरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेसाठी शिंदे फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. ज्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड, ग्रामविकासमंत्री शंभुराज देसाई, सहकारमंत्री अतुल सावे यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या...