एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : 'माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला

CM Eknath Shinde Aurangabad Tour:  मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे.

CM Eknath Shinde Aurangabad Tour: माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊन लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पैठण (Aurangabad News) दौऱ्यात रस्त्यावरील एसटीच्या बसेस बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री औरंगाबादला पोहोचल्यावर पैठणला जाताना, या दौऱ्यावेळी औरंगाबाद-पैठण रोडवरील एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच गरज पडल्यास पाचोडमार्गे या एसटी बसेस धावतील असाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे याचा फटका चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, कारकीन पिपळवाडीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अनेक विद्यार्थी सुद्धा एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे  याचा फटका महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे.

काय म्हटलं आहे आदेशात?

एसटी महामंडळाने काढलेल्या पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, दिनांक 12 ऑगस्ट 2022  रोजी सकाळी 11 वाजेनंतर पैठणहून औरंगाबादकडे व औरंगाबाद हून पैठणकडे जाणाऱ्या बसेस या मुख्यमंत्री हे पैठण येथे पोहचेपर्यंत अंदाजे 11.30 वाजेपर्यंत बिडकीन मार्गे जाणार नाहीत. प्रवाशी यांना आवश्यकता वाटल्यास त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशी उपलब्धतेनुसार पाचोड मार्गे बसेस पाठविण्याचे निर्णय पैठण स्थानक प्रमुख घेतील व औरंगाबाद येथे असाच निर्णय औरंगाबाद आगार क्र. 2 चे स्थानकप्रमुख हे घेतील.

मुख्यमंत्री अर्ध्या तासात पैठणला कसे पोहोचणार?

एसटी प्रशासनाने काढलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री अंदाजे अर्ध्या तासात पैठणला पोहोचतील असा उल्लेख केलेला आहे. मात्र औरंगाबाद ते पैठण दरम्यान मुख्यमंत्री यांचे जागोजागी स्वागत केले जाणार आहे. बिडकीन येथे मोठी रॅली निघणार आहे. त्यातच औरंगाबाद आणि पैठण एकूण पन्नास किलोमीटरचा मार्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अर्ध्या तासात पैठणला कसे पोहोचणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

CM Eknath Shinde at Aurangabad : कधीकाळी ज्या मैदानावर गाजलं बाळासाहेब ठाकरेंचं भाषण; तिथेच होतेय मुख्यमंत्र्यांची सभा

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech : खालून प्रेत गेलं असेल एखादं...राज ठाकरंची तुफान फटकेबाजी ABP MAJHARaj Thackeray Speech : मुंबई पाच नद्या होत्या, चार मेल्या...मिठी नदी सुद्धा मरायला आली आहेRaj Thackeray Speech : कुंभमेळा, गंगा ते प्रदुषण...राज ठाकरेंचं सरकारवर पलटवार ABP MAJHASpecial Report On PM Modi Nagpur : स्वंसेवक पंतप्रधान मोदी, संघाची स्तुती;भाजप-संघातली ओढाताण संपली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
Embed widget