Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं, औरंगाबादमधील बिडकीन येथील प्रकार
Aurangabad News Update : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री आज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडण्यात आलं आहे. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आल्याचं बोललं जातंय.
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री आज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं आहे. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आल्याचं बोललं जातंय. औरंगाबादमधील बिडकीन येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपडलंय. यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्हीकडून यावेळी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमधील पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. परंतु, त्यांच्या सभेआधीच हा प्रकास घडलाय. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते समजले जात होते. परंतु, त्याच शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट तयार केला आणि भाजपसोबत जात मुख्यमंत्री झाले. परंतु, शिंदे यांची ही बंडखोरी शिवसैनिकांना आवडलेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावर चांगलाच राग आहे. याचाच प्रत्येय आज औरंगाबादमध्ये आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या रस्त्यावरून गेले आहेत, त्या रस्त्याचं शिवसैनिकांकडून गौमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलंय.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ज्याठिकाणी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती तेथेच हा प्रकार झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गोमूत्र शिंपडणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या