Aurangabad: दिवसभरात 42 रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली; चौथ्या लाटेची भीती
Aurangabad News: वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासह स्वतःची काळजी घेण आवश्यक आहे.
![Aurangabad: दिवसभरात 42 रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली; चौथ्या लाटेची भीती maharashtra News Aurangabad Increase in the number of corona patients Aurangabad: दिवसभरात 42 रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली; चौथ्या लाटेची भीती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/1230a6cdc64e176de3f8a588aba62ce6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona Update Aurangabad: राज्यासह देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. अशा परीस्थीतीत औरंगाबादकरांची सुद्धा चिंता वाढताना पाहायला मिळत आहे. बुधवारी जिल्ह्यात दिवसभरात 42 रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची दररोज होणारी वाढ पाहता, चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. तर तिसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणावर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक...
बुधवारी जिल्ह्यात 42 रुग्णांची वाढ झाली. ज्यात 32 रुग्ण शहरातील तर 10 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. ज्यात शहरातील 14 तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तसेच जिल्ह्यात आजघडीला 147 रुग्ण सक्रीय असून, यातील बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहे. ज्यात घाटी रुग्णालयात 4 रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात 12 रुग्ण, डीसीएचसीमध्ये 7 रुग्ण आणि घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 124 एवढी आहे.
लसीकरणाचा आकडा
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाकडून पुन्हा एकदा लसीकरणावर भर दिली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 30 लाख 11 हजार 836 असून, दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा 23 लाख 14 हजार 437 एवढा आहे. तर 91 हजार 924 लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
अशी वाढली रुग्ण संख्या...
राज्यात गेल्या महिन्यात रुग्ण संख्या वाढत असताना औरंगाबाद जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी खरी रुग्ण संख्या वाढायला सुरवात झाली. 20 जूनला शहरात 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी 21 जूनला हा आकडा 13 वर गेला आणि तेथून सतत रुग्ण संख्या वाढत गेली. त्यांनतर 22 जूनला पुन्हा 13 रुग्ण, 23 जूनला 22 रुग्ण, 24 आणि 25 जूनला पुन्हा 22 रुग्ण, 26 जूनला 16 रुग्ण, 27 जूनला 9 रुग्ण, 28 जूनला 26 रुग्ण आणि 28 जूनला हा आकडा थेट 42 वर गेला आहे.
लसीकरण करण्याचे आवाहन...
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत एकही लस घेतली नाही त्यांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. सोबतच मास्क वापरणे बंधनकारक नसले तरीही नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्काचा वापर करावा असे आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून सतत केले जात आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)