अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर हंडा घेऊन कधी उभी दिसते का?; न्यायालयाचा महापालिकेला खरमरीत सवाल
Maharashtra Aurangabad News : औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) शहरातील पाणी प्रश्नावरून जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, बुधवारी यावर सुनावणी झाली.

Aurangabad Water Issue: गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहारतील (Aurangabad City) नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) शहरातील पाणी प्रश्नावरून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पुन्हा एकदा महानगरपालिकेचे कान टोचले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर कधी हंडा घेऊन उभी दिसते का? असा खरमरीत सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी झाली.
औरंगाबादच्या पाणी प्रश्नाच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अतिशय प्रतिकूल आणि असमाधानकारक कामाचा अहवाल खंडपीठात सादर करण्यात आला. या प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, याबाबत पुरेसे गांभीर्य नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे
Aurangabad Court : अतिरिक्त आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश...
औरंगाबादच्या पाणी प्रश्नाच्या याचिकेच्या सुनावणीवेळी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी गुरुवारी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. तसेच सुनावणीला कंत्राटदार कंपनी जीव्हीप- पीआरच्या प्रकल्प प्रमुखाला आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पाणीपुरवठा) यांना प्रत्यक्ष हजर राहण्याच्या तोंडी सूचना देखील खंडपीठाने दिल्या. जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असेही खंडपीठाने यावेळी बजावले.
Aurangabad Court : न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
औरंगाबाद शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेकडून शहरात काही ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली. मात्र शहरात अजूनही मुख्य जलवाहिनीवर घेण्यात आलेले अनेक बेकायद रहिवासी तसेच व्यावसाकि, राजकीय प्रभाव असलेल्या क्षेत्रातील नळ कनेक्शन अजूनही तसेच असल्याचे या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच औरंगाबाद पाणी प्रश्नावरून, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर कधी हंडा घेऊन उभी दिसते का? असा खरमरीत सवाल यावेळी न्यायालयाने उपस्थित केला.
Aurangabad : औरंगाबादचा पाणी प्रश्न कधी सुटणार...
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा सोडा पावसाळ्यात देखील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. यावरून अनेकदा राजकीय पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतात. तसेच प्रत्येक निवडणुकीत पाण्याचा मुद्दा आघाडीवर असतो, पण त्यानंतरही पाण्याचा प्रश्न कायम असतो. त्यामुळे आता औरंगाबादच्या नागरिकांना वेळेवर पाणी कधी मिळणार असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
