एक्स्प्लोर

Shirdi: शिर्डी संस्थान आणि बँकांची डोकेदुखी; वर्षभरात साडे तीन कोटीहून अधिक नाणी दानात, चिल्लर स्वीकारण्यास बँकांची असमर्थता 

Shirdi Sai Baba: दरवर्षी शिर्डी संस्थानमध्ये साडेतीन कोटी रुपयाहून अधिक नाणी प्राप्त होतात, ही नाणी बँकांनी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे.

अहमदनगर: लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांना भाविक यथाशक्ती दान देत असतात. यात सोने, चांदी तसेच रोख रकमेचे दानही प्राप्त होतय. मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकाची डोकेदुखी ठरतंय. वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांची नाणी प्राप्त होतात आणि ही नाणी स्वीकारण्यास बँका असमर्थतता दर्शवत आहेत. 

शिर्डीमध्ये दर्शनाला दररोज हजारो भाविक येतात आणि आपल्या इच्छेनुसार दानही करतात. या दानामध्ये दानपेटीत येणाऱ्या सुट्या नाण्यांचा मोठा समावेश असतो. साईसंस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी सात लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. मात्र आता ही नाणी स्वीकारणे बॅंकांना अवघड होऊन बसलंय. शिर्डीतील 12 हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साईसंस्थाचे खाते आहे. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडून असून नाण्यांच्या डोकेदुखीमुळे चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली आहे.

दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डी शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते उघडण्याचा विचार संस्थानकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटलं आहे. 

रामनवमीच्या तीन दिवसात चार कोटींचं दान

शिर्डीतील रामनवमी उत्‍सवाच्या काळात भाविकांनी साईचरणी कोट्यवधींच दान प्राप्त झालं आहे. तीन दिवसात दोन लाखाहून अधिक भाविकांनी साई दर्शन घेतले. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात साईबाबा संस्थानला एकूण चार कोटी नऊ लाख दान प्राप्त झालं आहे. यात दानपेटीत एक कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये जमा झाले आहेत. तर देणगी काउंटरव्‍दारे 76 लाख 18 हजार 143 रुपये दान करण्यात आले आहेत. 

त्याचबरोबर अनेक भाविक हे ऑनलाईन देणगी देत असतात. यात डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डर आदींद्वारे एक कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. यासोबत 8 लाख 64 हजारांचे 171 ग्रॅम सोने तर 01 लाख 21  हजार 813 रुपये किमतीची 2 किलो 713 ग्रॅम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. या दानाव्‍यतिरिक्‍त उत्‍सव काळात सशुल्‍क तसेच ऑनलाईन पासेसव्‍दारे एकूण 61 लाख 43 हजार 800 रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Pratibha Chakankar On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!
अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून 8 तास चौकशी, काय काय विचारलं?; प्रतिभा चाकणकर सगळं बोलून गेल्या!

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget