एक्स्प्लोर
LIVE : माझा इफेक्ट, मोपलवार पदच्युत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
'एबीपी माझा'च्या बातम्यांचे पडसाद आजही विधीमंडळात पाहायला मिळाले. समृद्धी महामार्गात कथित सेटलमेंटचा आरोप असलेले राधेश्याम मोपलवार आणि लातूर महिला तस्करीच्या बातम्या एबीपी माझाने दाखवल्या. त्यानंतर काल आणि आज यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
LIVE

Background
'एबीपी माझा'च्या बातम्यांचे पडसाद आजही विधीमंडळात पाहायला मिळाले. समृद्धी महामार्गात कथित सेटलमेंटचा आरोप असलेले राधेश्याम मोपलवार आणि लातूर महिला तस्करीच्या बातम्या एबीपी माझाने दाखवल्या. त्यानंतर काल आणि आज यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
17:24 PM (IST) • 03 Aug 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मोपलवार प्रकरणावर चौकशी केली जाईल, हे मी कालच स्पष्ट केलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मौपलवारांना या पदावर ठेवणार नाही. मोपलवारांवरील आरोप आधीचे आहेत. समृद्धी महामार्गप्रकरणाशी संबंधित हे आरोप नाहीत. मात्र विरोधी पक्षाची भावना लक्षात घेता, मोपलवारांना या पदावरुन दूर करणार.
17:21 PM (IST) • 03 Aug 2017
सुधीर मुनगंटीवार : हे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही.
17:22 PM (IST) • 03 Aug 2017
जयंत पाटील : खडसेंना एक न्याय, आणि प्रकाश मेहतांना दुसरा न्याय का?
17:19 PM (IST) • 03 Aug 2017
प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यावा, तसेच या प्रकरणाची चौकशी करा. मुख्यमंत्र्यांनी याआधीही मोपलवारांच्या चौकशीचे आदेश दिले होते. जर एवढं गंभीर प्रकरण असेल, तर मुख्यमंत्री या अधिकाऱ्यांना का पाठिशी घालत आहेत? अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी घेतली.
16:55 PM (IST) • 03 Aug 2017
मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालं असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत त्याबाबत स्पष्टीकरण
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
