एक्स्प्लोर

Panghrun Review : पांघरूण : खरंच विलक्षण अनुभव

Panghrun Review : 'पांघरुण' हा सिनेमा नाही तर शब्दांच्या पलिकडची कलाकृती आहे.

Panghrun Review : 'पांघरुण' या सिनेमासंदर्भात मी जेव्हा महेश मांजरेकर यांची मुलाखत घेतली होती तेव्हा ते म्हणाले होते की, हा सिनेमा म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम कलाकृती आहे. आणि जेव्हा मी हा सिनेमा पाहत होतो तेव्हा महेश मांजरेकरांचं ते विधान मला क्षणोक्षणी आठवत होतं. कमाल सिनेमा बनवला आहे. खरंच हा सिनेमा नाही तर शब्दांच्या पलिकडची कलाकृती आहे. 

सिनेमाची आणि सिनेमातली प्रत्येक बाजू उजवी आहे. हजारात, लाखात असा एक सिनेमा असतो. 'पांघरुण' त्यात अगदी वरच्या क्रमांकावर आहे. 'इलुसा हा देह किती खोल डोह…  स्नेह प्रेम मोह मांदियाळी' या ओळी म्हणजे या सिनेमाचं सार आहे. म्हणजे हा सिनेमा बा. भ. बोरकरांच्या कथेवर आधारित आहे, हे क्षणभर विसरलो तर या कथेनं या गाण्यांच्या ओळींना जन्म दिला की गाण्यांच्या शब्दांनी कथेला जन्म दिला? हे सांगणं कठीण होईल इतपत ते एकरुप झालं आहे.

इलुसा हा देह किती खोल डोह… किती खोल असू शकतो हा डोह… किती पदर असावेत…. किती भावना असाव्यात…. किती रंग असावेत… सारं एकाच देहातून जन्मलय, मग काय पाप आणि काय पुण्य?  काय चूक आणि काय बरोबर?

ते सारे रंग, ते सारे पदर, त्या साऱ्या भावना हा सिनेमा आपल्यापुढे मांडतो आणि पाप -पुण्याची गणितं आता तुम्हीच सोडवा असं म्हणत संपतो. पडद्यावर जरी संपत असला तरी तुमच्या मनात या पांघरुणाची उब आणि धग कित्येक दिवस राहते. 

गोष्टीबद्दल मी फार काही सांगणार नाही कारण ट्रेलरमधून त्याचा पुरेसा अंदाज येतो. पण एवढंच सांगेन हा सिनेमा त्या साऱ्याच्या पार पलिकडचा आहे. प्रेमकहाणी किंवा प्रेमाचा त्रिकोण एवढ्यापुरताच हा सिनेमा मर्यादित ठेवता येणार नाही.  

या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे गौरी इंगवले. महेश मांजरेकरांनी हा सिनेमा तिच्यासाठी केलाय. त्यामुळे गौरीच्या अभिनेत्री म्हणून असलेल्या जमेच्या बाजू आणि तिच्या मर्यादा यांचा व्यवस्थित अभ्यास करुन त्या चौकटीत लक्ष्मी रेखाटण्यात आलीय. त्यामुळे अगदी सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून ते क्लायमॅक्सपर्यंत कुठेही त्या भूमिकेचा तोल जात नाही. तिचा अल्लड, अवखळपणा, विधवा असूनही मला इंग्रज अधिकाऱ्याशी लग्न करायचं अाहे असं स्वत:च्या आईला बिनदिक्कतपणे सांगणारा बोल्ड आणि  बंडखोर स्वभाव ते दोन मुलींची सावत्र आई,  नवऱ्याच्या प्रेमासाठी आसुसलेली, पाप पुण्याची गणितं आपल्यापद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करणारी बायको या साऱ्या छटा तिने कमाल रंगवल्या आहेत. ती सहजता तिच्या अभिनयात दिसते. 

अनंताच्या भूमिकेत असलेल्या अमोल बावडेकरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. संयम हा त्या व्यक्तिरेखेचा आत्मा आहे. आणि अमोलने तेवढ्याच संयतपणे तो साकारलाय. त्याच्या डोळ्यांमधली सात्विकता, त्याची शब्दफेक, भगवंताची भजनं गातानाची तल्लीनता ते सारं पाहाताना आपल्याही चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात. 

या गोष्टीतलं मला महत्वाचं पात्र वाटतं ते राधाक्काचं. बोरकरांच्या ज्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे ती कथा मी वाचली नाहीये. त्यामुळे त्या कथेत ते पात्र आहे की नाही ठाऊक नाही. मात्र ही राधाक्का संपूर्ण कथेला खूप छान आधार देते. प्रेक्षक म्हणून आपल्याला पडणारे प्रश्न किंवा आपल्या भावना ती उपस्थित करते.  

लक्ष्मीला कोणीतरी आता समजवायला हवं असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हाच राधाक्का येते आणि अगदी मोजक्या संवादातून आपला निरोप ती लक्ष्मीपर्यंत पोहोचवते. क्षणाचा मोह वेगळा आणि अायुष्यभराची संगत वेगळी अशा संवादातून ती अगदी नकळतपणे लक्ष्मीच्या आयुष्याला आणि पर्यायानं कथेला वळण देत राहाते. विशेष म्हणजे लक्ष्मीच्या आत जे काही द्वंद्व सुरु आहे याची राधाक्काला पूर्ण जाणीव होऊनही ती नेहमीच समजून घेण्याच्या आणि समजवण्याच्या भूमिकेत आहे. सुलेखा तळवलकरांनी साकारलेली ही राधाक्का लक्षात राहाण्यासारखी आहे. 

प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, राधिका हर्षे, प्रभाकर मोरे आणि अर्थात रोहित फाळके या साऱ्यांनीच आपल्या वाट्याला आलेली भूमिका तेवढ्याच ताकदीने पार पाडली आहे. रोहित फाळकेने माधवच्या मनाची प्रत्येक अवस्था, प्रत्येक भावना निगुतीने टिपली आहे. 

सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद सारंच एकरुप झालंय. म्हणजे कधी कधी कथा सुंदर असूनही पटकथेमुळे सिनेमा संथ होऊ शकतो किंवा कठीण संवादांमुळे बोजड. इथं मात्र प्रत्येक बाजू एकमेकांना पूरक आहे. महेश मांजरेकर आणि गणेश मतकरी या दोघांनी ही जबाबदारी उत्तम रितीने पेलली आहे. 

आटोपशीर, गुंतवून ठेवणारी पटकथा आणि साधे सोपे मात्र तरीही थेट भिडणारे संवाद सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला कथेतून बाहेर येऊ देत नाहीत. 

कोणताही सीन तुटेपर्यंत ताणलेला नाही. हो, पण एक सीन आहे जो दिग्दर्शकाने ताणलेला नसला तरी आपली ताण सहन करण्याच्या क्षमतेचा कस लावतो, हा एक सीन आहे जिथं आत्तापर्यंत स्थीरपणे सगळं टिपणारा कॅमेरा पहिल्यांदाच थरथरतो आणि बॅकग्राऊंडला सुरु असलेल्या गाण्याप्रमाणे शब्दश: कासाविस करतो. अगदी काही क्षण पण ते युगासारखे वाटतात. 

करण रावत यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी देखणी आहे. प्रत्येक फ्रेम पेंटिंगसारखी आहे. कथेला, काळाला आणि पात्रांना साजेशी अशी ही कॅमेऱ्याची जादू रुपेरी पडद्यावर आवर्जून अनुभवण्यासारखी आहे. कसलाही झगमगाट न करता नेमकेपणानं साधलेला प्रकाशाचा खेळ या सिनेमाला आणखी प्रभावी बनवतो. 

जसं मी सुरुवातीला म्हणालो या सिनेमाची प्रत्येक बाजू उजवी आहे. कथा, पटकथा, संवाद, अभिनय, छाया, संकलन, संगीत सारंच… यात कोणालाच कमी-जास्त करता येणार नाही तरीही तरीही यातलं संगीत आपल्याला प्रेमात पाडतं. ती गाणी, ते शब्द, ती चाल आपल्याला स्वर्गीय अनुभव देतं. गाण्यांची संख्या जास्त आहे हे आपण फक्त सिनेमा सुरु व्हायच्या आधी म्हणू शकतो त्यानंतर अवघा रंग एक होतो. 

एक एक गाणं कमाल आहे. गोष्टीला आणखी श्रीमंत करणारं आहे.  'इलुसा हा देह' तर सिनेमाचं सार आहे. वैभव जोशीला त्याच्या या अप्रतिम शब्दांसाठी सलाम. डॉ. सलील कुलकर्णी, अजित परब, पवनदीप, हितेश मोडक या साऱ्यांनीच दिलेलं सांगीतिक योगदान मोलाचं आहे. 

शेवटी या साऱ्यांकडून सर्वोत्तम काम करवून घेणाऱ्या महेश मांजरेकरांबद्दल मी काही बोलण्यापेक्षा त्यांना एवढंच सांगेन की ज्या विश्वासाने तुम्ही पांघरुण ही तुमची आजवरची सर्वोत्तम कलाकृती आहे असं म्हणाला होतात त्यात अतिशयोक्ती नव्हती हा सिनेमा पाहिल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांचीही हीच भावना असेल.

View More
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget