एक्स्प्लोर

Bhaiyya Ji Review : मनोज वाजपेयीच्या अभिनयासाठी पाहावा 'भैया जी'; वाचा रिव्ह्यू

Bhaiyya Ji Review : मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) 'भैया जी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बदल्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांकडूनही बदलाच घेतो.

Bhaiyya Ji Review : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या अभिनयाची रेंज खूपच जबरदस्त आहे. मनोजचे 2023 मध्ये 'गुलमोहर', 'एक बंदा काफी है' आणि 'जोरम' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यांसारख्या असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. मनोजचा 'भैया जी' (Bhaiyya Ji) हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भैया जी' हा मनोजचा 100 वा चित्रपट आहे. त्याने चित्रपटाची निर्मितीही केली आहे. त्याची पत्नीच चित्रपटाची निर्माती आहे. चित्रपटात मनोजचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पण कथानकात मात्र नाविन्य नाही. 

'भैया जी'चं कथानक काय? (Bhaiyya Ji Story) 

'भैया जी' आपल्या लग्नसोहळ्याची तयारी करत आहे आणि दिल्लीहून येणाऱ्या आपल्या छोट्या भावाच्या लग्नाची तयारी करत आहे. त्याचा भाऊ स्टेशवर पोहोचतो. पण तिथे काही कारणाने दबंगचा भाऊ त्याचा जीव घेतो. भैया जीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा हिंसा सोडलेला तो बदला घ्यायला लागतो. तो कशाप्रकारे बदला घेतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 

'भैया जी' कसा आहे? 

'भैया जी' हा चित्रपट 20 ते 25 वर्षांपूर्वी आला असता तर कमाल वाटला असता असं वाटतं. आजच्या घडीला सत्यघटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडत आहेत. मनोज वाजपेयीने आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपट दिलेले आहेत. त्यासमोर हा चित्रपट मात्र त्याचा स्टँडर्ड डाऊन करणारा ठरतो. चित्रपट लवकरच मुळ मुद्द्यावर येतो. अॅक्शन ठिक आहेत. पण चित्रपट मात्र आधीच्या दशकातला वाटतो. सिंगल स्क्रिनवर हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल. पण आजच्या काळातील तरुणांना मात्र हा चित्रपट आवडणार नाही. 

मनोजचा कमाल अभिनय

मनोज वाजपेयीचा अभिनय कमाल आहे.  मनोज आपल्या भूमिकेच्या माध्यमातून तो कमालीचा अभिनेता आहे हे सिद्ध करतो. भावाच्या मृत्यूचा बदला घेणं असो किंवा त्याचा मृत्यून झाल्याने तांडव करणं असो प्रत्येक सीनमध्ये मनोज आपल्या अभिनयाने छाप पाडतो. मनोज या चित्रपटाचा जान आहे. विपिन शर्माने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सुविंदर विक्की कमजोर खलनायकाच्या भूमिकेत आहे. जोया हुसैननेही बरं काम केलं आहे.

अपूर्व सिंह कार्कीने 'भैया जी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याआधी त्यांनी 'एक बंदा काफी है' सारखे शानदार चित्रपट बनवले आहेत. पण इथे मात्र कथानका पासून ते सिलेक्शनपर्यंत काहीतरी गडबड झाली आहे. 20 वर्षांपूर्वी जर त्यांनी हा चित्रपट बनवला असता तर त्याचं कौतुक झालं असतं. आता मात्र त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पण मनोज वाजपेयीच्या अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget