एक्स्प्लोर
LIVE - बेळगावात घुमणार जय महाराष्ट्रचा आवाज
कोल्हापूर/ बेळगाव : मराठीजनांची गळपेची करणारे कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्याविरोधात आज बेळगावात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी परिपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. बेळगावात आज दुपारी 12 वाजता संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
LIVE
Background
कोल्हापूर/ बेळगाव : मराठीजनांची गळपेची करणारे कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्याविरोधात आज बेळगावात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी परिपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.
बेळगावात आज दुपारी 12 वाजता संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयातवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
11:36 AM (IST) • 25 May 2017
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चासाठी बंदी घातल्यावर, राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दीवाकर रावते चांगलेच संतापले. ते कोल्हापुरात बोलत होते.
शिवसैनिक असतो तर केव्हाच बंदी झुगारून गेलो असतो, परंतु राज्याचा मंत्री म्हणून मोर्चात सहभागी होण्यासाठी मी पूर्ण नियोजित कार्यक्रम सरकारी दौरा देऊनही मला बंदी आदेश जारी केला. मंत्र्यांना केलेल्या बंदीबाबत उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचं रावतेंनी सांगितलं.
तसंच सीमा लढ्यासाठी शिवसेनेचं मोठं योगदान असल्याचंही रावते म्हणाले.
दरम्यान बंदी आदेश जुगारून बेळगावला जाणाऱ्या मंत्री दीवाकर रावते यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवलं असून त्यांना बेळगाव प्रवेश बंदीची नोटीसही बजावली.
11:27 AM (IST) • 25 May 2017
शिवसेना मंत्री दीवाकर रावते कोल्हापूरकडे रवाना, बेळगाव पोलिसांनी कोगनोळीजवळ रावतेंना रोखलं
11:26 AM (IST) • 25 May 2017
11:44 AM (IST) • 25 May 2017
संबंधित बातम्या
11:44 AM (IST) • 25 May 2017
कर्नाटकात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रवेशबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा
बेळगाव : 'जय महाराष्ट्र' म्हटल्यास पद रद्द करण्याचा अजब फतवा कर्नाटक सरकारचे
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement