Women Health: हिवाळ्यातच मासिक पाळीच्या असह्य वेदना, मूड स्विंग का वाढतात? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितली अशी गोष्ट, व्हाल थक्क!
Women Health: बहुतेक महिलांना हिवाळ्यात मासिक पाळीच्या काळात जास्त त्रास होऊ लागतो. यावेळी वेदना सहन करणे देखील कठीण होते. याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेऊया.
Women Health: जन्म बाईचा..खूप घाईचा.. असं जेव्हा म्हटले जाते, जे काही खोटं नाही. महिलांना त्यांच्या वाढत्या वयासोबत अनेक शारिरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशात जर ऋतू बदलला, तर त्याचा आणखीन त्रास स्त्रीला होतो. तसं पाहायला गेलं तर, हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो. यातील एक समस्या म्हणजे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या असह्य वेदना. या काळात काही महिलांना हा त्रास असह्य होतो, आणि मग त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. याचे नेमके कारण काय? असे हिवाळ्यातच का होते? याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेऊया.
हिवाळ्यात मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास...
मासिक पाळी दरम्यान अनेकदा पोट फुगणे, अंगदुखी, क्रॅम्प्स, मूड बदलणे, थकवा येणे, जे सहन करणे कठीण होते. यासोबतच जास्त रक्तस्रावामुळे शरीरात अशक्तपणा येतो. हिवाळ्यात मासिक वेदना वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया याविषयी आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, डॉ. कुसुम लता सांगतात की, हिवाळ्यात मासिक पाळी दरम्यान समस्या वाढतात. त्यामुळे महिलांनी यावेळी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात उबदार, हायड्रेटेड आणि सक्रिय राहण्याकडे अधिक लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. उबदार कपडे घाला, पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करा आणि संतुलित आहार घ्या. कॅफिन टाळा कारण ते तुमच्या मासिक पाळीच्या वेदना सहजपणे वाढवू शकतात. जर तुमच्या मासिक पाळीची लक्षणे गंभीर असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हिवाळ्यातच ही समस्या का उद्भवते?
रक्ताभिसरण कमी होणे- थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे गर्भाशयात रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे तुमच्या वेदना आणि पेटके वाढू शकतात. यामुळे मासिक पाळीच्या वेदना सामान्यपेक्षा जास्त वाढतात.
सूर्यप्रकाशाचा अभाव- हिवाळ्यात दिवसा सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे वेदना आणि मूड बदलू शकतात.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती- हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे, तुमचे शरीर जळजळांशी लढण्यास सक्षम नाही, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते.
हेही वाचा>>>
Women Health: मासिक पाळी चुकली? किती उशीरानं पाळी येणं सामान्य? गर्भधारणा व्यतिरिक्त, ही 3 कारणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )