100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार, हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल.
सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा, कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा.
सौंदानामधील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूप्रकरणी टिप्पर चालक भोजराज देवकरला अटक, परळीत राखेची वाहतूक करताना टिप्परच्या धडकेत सरपंचाचा झालेला मृत्यू
खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज केज न्यायालयात हजर केलं जाणार, देशमुख हत्या प्रकरणात देखील चाटे आरोपी असल्याने सीआयडीने केज न्यायालयाकडे चाटेच्या कस्टडीची मागणी केली होती
नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर भीषण अपघात, लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक, 5 जणांचा मृत्यू,(( मृत्यू झालेले सगळे कामगार असल्याची माहिती. ))