एक्स्प्लोर

MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर

MAHARERA : महारेरा नोंदणीसाठी मदत करणारे स्वयंविनियामक संस्थांमधील  प्रतिनिधी  कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिकपैकी किमान एका बाबीं संदर्भात तज्ज्ञ असावेत महारेराचा आग्रह आहे.

मुंबई : महारेराकडे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीत मदत करणाऱ्या विविध स्वयंविनियामक संस्थांच्या प्रतिनिधींचा कालावधी महारेराने हितसंबंध निर्माण होऊ नये यासाठी जास्तीत जास्त 2 वर्षांचा राहील , असे निश्चित केले आहे. शिवाय हे प्रतिनिधी नोंदणी करताना आवश्यक असलेल्या प्रकल्पाच्या कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक निकषांपैकी  किमान एका विषयाचे तज्ज्ञ असावेत, असाही आग्रह महारेराने धरला आहे.  ज्या प्रतिनिधींना 2 वर्षे झाली असतील त्यांना तातडीने बदलण्याचे निर्देशही महारेराने या स्वयंविनियामक संस्थांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. 

 प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पासाठी, काही अटींसापेक्ष, महारेराकडे नोंदणी करून नोंदणीक्रमांक घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्या प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही. विक्री करता येत नाही. कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाचे भविष्य ठरविण्यात प्रकल्पाचे सर्वच बाबतीतील कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून महारेरा नोंदणीक्रमांक देताना या त्रिस्तरीय निकषांवर प्रत्येक प्रस्तावाची छाननी करूनच नोंदणीक्रमांक देते. यात स्वयंविनियामक संस्थांचे महारेरातील प्रतिनिधी आपापल्या सदस्य प्रवर्तकाला नवीन नोंदणीसाठी अधिकृतपणे मदत करतात . छाननीत निघालेले शेरे या प्रतिनिधींना देऊन त्यांना त्याची पूर्तता करून घेण्यास सांगितले जाते. सध्या महारेरात 7 स्वयंविनियामक संस्था कार्यरत आहेत. 

स्वयंविनियामक संस्थांच्या सदस्य प्रवर्तकांना प्रभावीपणे मदत व्हावी यासाठी त्यांनी कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक घटकांपैकी किमान एकाचे तज्ज्ञ असलेले  प्रतिनिधी नेमावेत.  महारेरात या प्रतिनिधींना तांत्रिकदृष्ट्या एकच जागा उपलब्ध करून देणे शक्य असल्याने त्यांनी आपले हे प्रतिनिधी गरजेनुसार आळीपाळीने उपस्थित राहतील याची त्यांच्या पातळीवर व्यवस्थित काळजी घ्यावी , असेही आवाहन महारेराने या पत्रात केले आहे.

महारेराकडे सध्या विकासकांच्या एकूण 7 स्वयं विनियामक संस्था ( Self Regulatory Organisation-SRO) नोंदणीकृत आहेत. यात 
नरेडको पश्चिम फाऊंडेशन  (NAREDCO West Foundation), क्रेडाई एमसीएचआय (CREDAI-MCHI), क्रेडाई महाराष्ट्र (CREDAI MAHARASHTRA ), बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BUILDERS ASSOCIATION OF INDIA ),  मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन (MARATHI  BANDHKAM VYAVSAYIK ASSOCIATION) , बृहन्मुंबई डेव्हलपर  असोसिएशन (BRIHANMUMBAI DEVELOPER ASSOCIATION.) आणि क्रेडाई- पुणे मेट्रो (  CREDAI- Pune Metro )
यांचा समावेश आहे.

महारेराकडे प्रकल्प नोंदणी करताना संबंधित विकासक सध्या या   7 पैकी एका संस्थेचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे . 
महारेरा विकासकांच्या अर्जांची छाननी करुन ते ज्या संस्थेचे  सदस्य असतात त्याच संस्थेच्या  प्रतिनिधींना  याबाबतची माहिती व त्यासंबंधीत निघालेल्या शेऱ्यांची यादी पुरवतात.  हे संस्था प्रतिनिधी त्यांच्या नोंदणीकृत  सदस्य असलेल्या विकासकांच्या  अर्जांबाबत पाठपुरावा करुन महारेरा व विकासकांमधील  दुवा बनलेले आहेत . 

इतर बातम्या :

Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासानMNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शितKolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget