IND vs ENG T20 Series : टीम इंडियातून हे 3 युवा खेळाडूंचा पत्ता कट; उपकर्णधारालाही जागा मिळाली नाही; 'गंभीर' निर्णयाने पुन्हा आश्चर्यचकित होण्याची वेळ!
IND vs ENG T20 Series : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना अधिक संधी दिल्याचा आरोप मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर होत आहे. पण यामुळे गंभीर यांच्यावर कोणताही दबाव आलेला नाही.
IND vs ENG T20 Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने शनिवारी रात्री या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. इंग्लंडने टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी आधीच आपला संघ जाहीर केला आहे. काही काळापूर्वी भविष्यातील स्टार समजल्या जाणाऱ्या अशा अनेक खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळालेली नाही.
या 3 खेळाडूंना संधी मिळाली नाही
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत शेवटची टी-20 मालिका खेळला होता. त्या मालिकेत वेगवान गोलंदाज आवेश खान, डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल आणि मधल्या फळीतील फलंदाज रमणदीप सिंग हे टीम इंडियाचा भाग होते, मात्र या तिन्ही खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवड झालेली नाही.
उपकर्णधारालाही संधी मिळाली नाही
रमणदीप सिंगच्या जागी नितीशकुमार रेड्डीला इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली आहे. तर आवेश खान आणि यश दयाल यांच्या जागी मोहम्मद शमी आणि हर्षित राणा टीम इंडियाचा भाग आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे नुकताच उपकर्णधार बनलेल्या शुभमन गिलला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळालेले नाही. मात्र, गिलसह ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल हेदेखील या संघात नाहीत. अशा परिस्थितीत या खेळाडूंना एकदिवसीय मालिकेत संधी मिळेल, कारण त्यांना 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना अधिक संधी दिल्याचा आरोप
आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट होती. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना अधिक संधी दिल्याचा आरोप मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर होत आहे. पण यामुळे गंभीर यांच्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी आपल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
इतर महत्वाच्या बातम्या