Viral: ब्रेड घेण्यासाठी गेली अन् एका रात्रीत चिमुरडीचं नशीबचं चमकलं! बनली ब्रँड ॲम्बेसेडर, 'असा' घडला चमत्कार?
Viral: परिस्थिती कितीही कठीण असली, तरी कोणत्याही व्यक्तीचे नशीब कधीही बदलू शकते हे या घटनेने सिद्ध होते. असंच काहीसं एका चिमुरडीसोबत घडलंय.
Viral: ते म्हणतात ना.. की, जेव्हा नशीब तुमच्या सोबत असते, तेव्हा एखादी छोटीशी गोष्टही तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणते. असंच काहीसं दक्षिण आफ्रिकेतील एका चिमुरडीसोबत घडलं, एके दिवशी ब्रेड आणायला गेली, आणि त्याचवेळी तिचं नशीब असं पालटलं की ती चक्क 'ब्रँड ॲम्बेसेडर' बनलीय, त्याक्षणी घडलेल्या एका गोष्टीमुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे.
मुलीचा निरागसपणा भावला...!
एका रात्रीत ज्या चिमुरडीचे नशीबच बदलले, ती दक्षिण आफ्रिकेत राहणारी एक चार वर्षांची मुलगी आहे, जी तिच्या घराजवळच्या दुकानातून ब्रेड घेण्यासाठी गेली होती. माहितीनुसार, तिला वडील नाहीत आणि तिची आई तिचे एकटीने संगोपन करत आहे. एके दिवशी ती मुलगी ब्रेड घ्यायला गेली तेव्हा एका फोटोग्राफरला तिचे निरागस हास्य आणि साधा चेहरा दिसला. फोटोग्राफरने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तर असं या चिमुरडीचं नशीब पालटलं..!
लुंगीसानी म्झाजी असे या छायाचित्रकाराचे नाव असून, ते ‘श्वानेन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’मधील नवोदित व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. जेव्हा त्याने या मुलीचा फोटो क्लिक केला तेव्हा हा फोटो किती प्रभावी ठरेल याची त्याला जराही कल्पना नव्हती. हातात ब्रेडचे पॅकेट आणि चेहऱ्यावर गोंडस हास्य असलेल्या या मुलीच्या फोटोने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली. हा फोटो व्हायरल होताच लोकांनी ब्रेड कंपनीला मेसेज पाठवून मुलीला ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याची मागणी केली.
चिमुरडी ब्रेड कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर कशी बनली?
लोकांची मागणी आणि मुलीचा निरागसपणा पाहून संबधित ब्रेड कंपनी 'अल्बानी'ने या मुलीला आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले. यानंतर आता संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत ब्रेडची जाहिरात करणाऱ्या होर्डिंग्ज आणि बोर्डवर या मुलीची छायाचित्रे दिसत आहेत.
मुलीचे आणि तिच्या कुटुंबाचे नशीब बदलले
कंपनीनेही मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला. ब्रेड कंपनीने मुलीला आपली ब्रँड ॲम्बेसेडर तर बनवलीच, पण तिच्यासाठी नवीन दोन खोल्यांचे घरही बांधले. एवढेच नाही तर मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार असल्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे. एका सामान्य कुटुंबासाठी ही मोठी गोष्ट आहे, ज्यांची आर्थिक स्थिती पूर्वी खूपच कमकुवत होती.
एका फोटोने माझे आयुष्य बदलले
परिस्थिती कितीही कठीण असली तरी कोणत्याही व्यक्तीचे नशीब कधीही बदलू शकते हे या घटनेने सिद्ध होते. या मुलीच्या एका साध्या चित्राने तिचे आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
हेही वाचा>>>
Viral : 5 लाखांचं कर्ज घेऊन सुरू केलं काम, असं चमकलं नशीब, आता 150 कोटींची करतो उलाढाल! बड्या स्टार्सची बनला पसंती
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )