एक्स्प्लोर

Shravan 2023 : आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती

Shravan 2023 : श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. याच निमित्ताने श्रावण महिन्यातील महत्वाचे दिवस कोणते, व्रतवैकल्ये कोणती हे आपण जाणून घेणार आहोत.

Shravan 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार यंदा श्रावण महिना खास आहे. यंदाचा श्रावण 30 दिवसांचा नसून 59 दिवसांचा आहे. यंदा 18 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 अधिक मास आणि 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 हा श्रावण मास आहे. यंदा 17 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून निज श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना 14 सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा अधिक मास श्रावणाचे चार श्रावण सोमवार असतील. आणि यंदाचे निज श्रावणी सोमवार चार असणार. म्हणजे एकूण 8 सोमवार असतील. 

श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहेत. कारण याच महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला यांसारखे मोठे सण साजरे केले जातात. या व्यतिरिक्तही श्रावण महिन्यात अनेक महत्वाचे दिवस साजरे केले जातात. याच महत्वाच्या दिवसांची, सणांची माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत.  

20 ऑगस्ट - विनायक चतुर्थी

निज श्रावण शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीचा उपवास रविवार, 20 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी बाधा श्री गणेशाची विधिवत पूजा करतात. विशेष म्हणजे ही पूजा दुपारपर्यंत पूर्ण होते. कारण या व्रतामध्ये चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. 

21 ऑगस्ट - नागपंचमी 

रविवार व्यतिरिक्त अगदी दुसऱ्याच दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी (Nag Panchami 2023). यंदा नागपंचमीचा सण 21 ऑगस्ट 2023 रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. काही भागांत चिखलाचा नागदेवता करतात. तर काही ठिकाणी प्रतिकात्मक फोटोची पूजा करतात. काही ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा करतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करतात. 

21 ऑगस्ट : श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : तांदूळ 

श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे मानले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे.

22 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन 

निज श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 

22 ऑगस्ट : कल्की जयंती 

कल्की जयंती हा एक हिंदू सण आहे जो कल्किचा भविष्यातील जन्म साजरा करतो, विष्णूचा अंतिम अवतार, जो कलियुगात जन्मला होता, कलिसह जगाच्या दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, सत्ययुगात काळाचे चाक वळवतो.

23 ऑगस्ट : गोस्वामी तुलसीदास जयंती 

गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते. तुलसीदासांचा जन्म इसवी सन 1497 या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला. वाल्मिकी रामायणानंतर गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले रामचरितमानस अधिक प्रमाण मानले जाते. श्रावण शुद्ध सप्तमीला तुलसीदासांचा जन्म झाला. तुलसीदासांना युगप्रवर्तक हिंदी महाकवी, असे संबोधले जाते.

25 ऑगस्ट : वरदलक्ष्मी व्रत 

निज श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मीदेवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दिवशी घराची साफसफाई केली जाते. पूजेची तयारी केली जाते. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प केला जातो. तसेच चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. या दिवशी देवीला नैवेद्य दाखवावा. सुवासिनींना वाण द्यावे. तसेच वरदलक्ष्मी कहाणीचे पठण करावे. 

27 ऑगस्ट : पुत्रदा एकादशी 

हिंदू धर्मग्रंथानुसार, पुत्रदा एकादशी 2023 वर्षातून दोनदा येते. पहिला पुत्रदा एकादशी व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ठेवला जातो तर दुसरा पुत्रदा एकादशी व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी 2023 असे म्हणतात. या व्रतामध्ये भक्त पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भगवान विष्णूची खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा करतात. यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतात.

28 ऑगस्ट : श्रावणी सोमवार शिपूजन शिवामूठ : तीळ 

श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार 28 ऑगस्ट 2023 रोजी येणार आहे. या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. 

30 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचा सण आहे. हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.

30 ऑगस्ट : रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमाही असते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या परंपरेला रक्षाबंधन म्हणतात. रक्षाबंधन हा मूळ उत्तरी भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.

3 सप्टेंबर : संकष्ट चतुर्थी 

या महिन्यातील संकष्ट चतुर्थी 3 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते असे मानले जाते. यावर्षी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 09.23 आहे. 

4 सप्टेंबर : श्रावणी सोमवार शिवपूजन  शिवामूठ : मूग

श्रावण महिन्यात सोमवारच्या तिथीला अत्यंत महत्त्व असते. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. या सोमवारची शिवामूठ मूग आहे. 

6 सप्टेंबर : श्रीकृष्ण जयंती (उपवास)

श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.

6 सप्टेंबर : ज्ञानेश्वर महाराज जयंती 

संत ज्ञानेश्वर हे 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ होते. फक्त 16 वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांची रचना केली. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली. ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये आळंदी येथे समाधी घेतली.

7 सप्टेंबर : गोपाळकाला 

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. हंडी फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. 

11 सप्टेंबर : श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : जव 

श्रावणातील चौथा श्रावण सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी येणार आहे. या सोमवारची शिवामूठ जव आहे. 

14 सप्टेंबर : पोळा, पिठोरी अमावस्या, निज श्रावण अमावस्या 

श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे म्हणतात. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा सण साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.

बृहस्पती पूजन 

श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. 

जरा -जिवंतिका पूजन 

श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.

अश्वत्थमारूती पूजन 

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 

आदित्य पूजन 

श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु, कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Alliance Talks : 'Congress ला कोणताही प्रस्ताव दिला नाही' - MNS नेते संदीप देशपांडे
Pune Politics: 'माझ्यावर MCOCA लावण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कट', रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
Maharashtra Politics: 'मंत्रीपद सोडा, गट विलीन करा'; Ramdas Athawale यांच्या ऑफरवर Prakash Ambedkar यांच्या VBAचं थेट उत्तर
Pawar Politics: 'अजित पवारांना माझी भूमिका माहित आहे', Chhagan Bhujbal यांचे वक्तव्य, NCP मध्ये अंतर्गत कलह?
Ramdas Athawale on Prakash Ambedkar : आठवलेंची आंबेडकरांना साद, वंचितचा 'राजीनामा' प्रस्ताव Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील ती योजना बंद होणार नाही; शासनाचं स्पष्टीकरण, निकषांमध्ये आणखी सुधारणा
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
मोठी बातमी! यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
मोठी बातमी! यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
Embed widget