एक्स्प्लोर

Important Days in August 2023 : 'स्वातंत्र्य दिन', 'रक्षाबंधन'सह विविध सणांची मांदियाळी, ऑगस्ट महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

Important Days in August 2023 : ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत.

Important Days in August 2023 : श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना आहे. महाराष्ट्रात 17 ऑगस्टपासून निज श्रावण मासारंभ होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. या महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, पतेती, नारळी पौर्णिमा यांसारखेे सण साजरे केले जाणार आहेत. तसेच, या निमित्ताने अनेक व्रतवैकल्येही केली जाणार आहेत. पण त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. हे दिवस नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 

1 ऑगस्ट - अधिक श्रावण पौर्णिमा 

हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण अधिक शुक्ल पक्षाची पौर्णिमा 01 ऑगस्ट रोजी पहाटे 05.21 पासून सुरू होईल आणि 02 ऑगस्ट रोजी पहाटे 01.31 वाजता समाप्त होईल. 

1 ऑगस्ट : अण्णा भाऊ साठे जयंती 

कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले मराठी साहित्यिक म्हणजे अण्णा भाऊ साठे. त्यांचं संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे परंतु, सगळे त्यांना अण्णा भाऊ साठे म्हणूनच ओळखतात. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. अण्णा भाऊ साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले आणि त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 

1 ऑगस्ट : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली.

4 ऑगस्ट : संकष्ट चतुर्थी 

 या महिन्यातील संकष्ट चतुर्थी 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते असे मानले जाते. यावर्षी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 09.32 आहे. 

4 ऑगस्ट : First Friday of August – International Beer Day

जगभरातील लोक हजारो वर्षांपासून बीअर पीत आहेत. बीयर हे एक लोकप्रिय अल्कोहोलिक पेय आहे. साधारणत: बीअरमध्ये 4-6 टक्के अल्कोहोल (Alcohol) असते. मात्र, काही बीअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असू शकते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘इंटरनॅशनल बीअर डे’ साजरा केला जातो. बीअरच्या सेवनाने शरीराला काही फायदे मिळतात तर त्याचे काही तोटेही असतात. बीअर आंबवलेल्या धान्यापासून बनवली जाते.

5 ऑगस्ट : अभिनेत्री काजोलचा वाढदिवस 

काजोल  ही  भारतीय सिने-अभिनेत्री आणि बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर 6 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत ज्यांपैकी विक्रमी 5 पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. 2011 साली भारत सरकारने काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. काजोलच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस आल्या. यामध्ये 'कुछ-कुछ होता है' मधील 'अंजली' या भूमिकेने काजोलला वेगळीच ओळख मिळवून दिली. 

6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन (Hiroshima Day)

6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात 1 लाख 40 हजार नागरिकांनी जीव गमावला होता. तर, त्यानंतर लगेच तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील आणखी एक शहर नागासाकी येथे बॉम्बस्फोट झाला. 'बॉक्सकार' नावाच्या बी.29 विमानाने 'फॅट मॅन' नावाचा अणूबॉम्ब नागासाकी शहरावर टाकला होता. या हल्ल्यात नागासाकीमधल्या 80 हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. यामध्ये जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले.

6 ऑगस्ट : ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार : जागतिक मैत्री दिन (Friendship Day)

भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. 1958 पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतात. तसेच, हाताला रंगीत फ्रेंडशिप बॅंड्स बांधतात. फुलं देतात, अनेक गिफ्ट्सही देतात आणि शुभेच्छा देतात.

9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिन. 

संयुक्त राष्ट्रसंघाने या आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे हक्क, अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी 1993 साल हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. 

9 ऑगस्ट क्रांती दिन

9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट 1942 रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला होता 

11 ऑगस्ट - अभिनेता सुनील शेट्टीचा वाढदिवस 

सुनील शेट्टी हा एक भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता आणि उद्योजक आहे. साधारणपणे 25 वर्षांहून अधिक काळ सुनील शेट्टीने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काम केले आहे. आतापर्यंत त्याने 110 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये सर्वाधिक काम केले आहे. तसेच, त्यांनी हिंदी तसेच मल्याळम, तमिळ आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

12 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day)

आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या निमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते, अनेक चर्चासत्र आयोजित केली जातात. 1985 मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे करण्यात आले.

19 ऑगस्ट : जागतिक फोटोग्राफी दिन (World Photography Day)

19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो.  पहिला फोटो 1839 रोजी काढण्यात आला. त्या दिवसापासून जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात झाली. जागतिक फोटोग्राफी दिवस केवळ आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात साजरा केला जातो. 

19 ऑगस्ट : जागतिक मानवतावादी दिन (World Humanitarian Day)

19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिन म्हणून मानला जातो. जगभरातील मानवतावाद्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गरजू आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी मनोभावे, अखंड आणि अविरतपणे तत्पर असणाऱ्या मानवतावादी लोकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. गरजू लोकांना योग्यवेळी योग्य ते सहाय्य मिळालं पाहिजे हा या दिवसाचा खरा संदेश आहे.

20 ऑगस्ट : जागतिक डास दिन (World Mosquito Day)

दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी ‘जागतिक डास दिन’ साजरा केला जातो. डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. मलेरिया हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे यावरील घरगुती उपचार माहित असणे आवश्यक आहे यासाठी या दिनाचं महत्त्व आहे. 

13 ऑगस्ट : अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे)

 महाराष्ट्रातील  पितृसत्ताक संस्कृतीला तडा देणारे एक नाव म्हणजे “अहिल्याबाई होळकर” आहे. अशा कर्तृत्ववान महिलांमुळे महाराष्ट्राला धाडसी स्त्रियांचा वारसा लाभला आहे. अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील जामखेड मध्ये झाला होता. उत्तम शासक आणि योग्य न्याय करणारी राणी म्हणून त्यांची ओळख होती. राणी अहिल्यादेवी यांनी भारतात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर आणि इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन (Independence Day)

15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन. ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट इ.स. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

15 ऑगस्ट : पतेती 

पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा ‘पतेती’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. 

16 ऑगस्ट : पारशी नूतनवर्ष 

पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार  वर्षाचा शेवटचा दिवस हा ‘पतेती’म्हणून ओळखला जातो. या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी ‘पतेती’ सण आहे, तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं करणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणून देखील ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ ‘फरवर्दीन’ माहिन्याने होतो.

17 ऑगस्ट : निज श्रावण मासारंभ

हिंदू कॅलेंडरनुसार यंदा श्रावण महिना खास असणार आहे. यंदाचा श्रावण 30 दिवसांचा नसून 59 दिवसांचा आहे. यंदा 18 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 अधिक मास आणि 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 हा श्रावण मास आहे. यंदा 17 ऑगस्टपासून निज श्रावण महिना सुरू होईल तो 14 सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा अधिक मास श्रावणाचे चार श्रावण सोमवार असतील. आणि यंदाचे निज श्रावणी सोमवार चार असणार. म्हणजे एकूण 8 सोमवार असतील. 

17 ऑगस्ट : बृहस्पती पूजन

श्रावणातील प्रत्येक दिवशी देवांची आरासना, पूजा केली जाते. याच श्रावणात प्रत्येक गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत सात वर्ष केले जाते.

18 ऑगस्ट : जरा-जिवंतिका पूजन 

श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. या दिवशी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा केली जाते. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घातली जाते. पुरण-वरणाचा नैवेद्य दाखवला जातो. 

19 ऑगस्ट : अश्वत्थ मारूती पूजन 

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दूध पिंपळाला वाहतात. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 

20 ऑगस्ट : विनायक चतुर्थी

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीचा उपवास रविवार, 20 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी बाधा श्री गणेशाची विधिवत पूजा करतात. विशेष म्हणजे ही पूजा दुपारपर्यंत पूर्ण होते. कारण या व्रतामध्ये चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. 

20 ऑगस्ट : आदित्य पूजन 

श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु, कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.

21 ऑगस्ट : नागपंचमी

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, दुर्वा वाहून पूजा करतात.

22 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन. 

श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 

22 ऑगस्ट : कल्की जयंती 

कल्की जयंती हा एक हिंदू सण आहे जो कल्किचा भविष्यातील जन्म साजरा करतो, विष्णूचा अंतिम अवतार, जो कलियुगात जन्मला होता, कलिसह जगाच्या दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, सत्ययुगात काळाचे चाक वळवतो.

23 ऑगस्ट : गोस्वामी तुलसीदास जयंती

गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते. तुलसीदासांचा जन्म इसवी सन 1497 या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला. वाल्मिकी रामायणानंतर गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले रामचरितमानस अधिक प्रमाण मानले जाते. श्रावण शुद्ध सप्तमीला तुलसीदासांचा जन्म झाला. तुलसीदासांना युगप्रवर्तक हिंदी महाकवी, असे संबोधले जाते.

26 ऑगस्ट : चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा वाढदिवस

मधुर भांडारकर हे एक मराठी-भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आहेत. त्यांनी हिंदी भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. चांदनी बार, फॅशन हे चित्रपट प्रेक्षकांच्या फारच पसंतीस पडले. 

26 ऑगस्ट : महिला समानता दिन (Women’s Equality Day)

महिला समानता दिन दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 26 ऑगस्ट रोजी 1920 मध्ये महिलांना अधिकृतपणे यूएस संविधानात मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो.

27 ऑगस्ट : पुत्रदा एकादशी

हिंदू धर्मग्रंथानुसार, पुत्रदा एकादशी 2023 वर्षातून दोनदा येते. पहिला पुत्रदा एकादशी व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ठेवला जातो तर दुसरा पुत्रदा एकादशी व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे म्हणतात. या व्रतामध्ये भक्त पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भगवान विष्णूची खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा करतात. 

29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day)

29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. 

30 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.

30 ऑगस्ट : रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी  राखी पौर्णिमा साजरी केली जाते. भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात आणि तोंड गोड करतात. तसेच, भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget