(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सावधान! तणावामुळे वाढतोय डोकेदुखीचा त्रास, तरुणांना जास्त धोका; जाणून घ्या कारण
Health Tips : कोरोनानंतर 93% लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या लक्षणीय वाढली आहे. डोकेदुखीचे कारण तणावाच्या पातळीशी संबंधित आहे.
Health Tips : एका अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यानुसार भारतात डोकेदुखीची समस्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना (Covid 19) महामारीचा सर्वात वाईट परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. तणाव आणि तणावाची प्रकरणे वाढली आहेत. नुकत्याच आलेल्या या अहवालानुसार भारतावर कोरोनाचा वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे देशात डोकेदुखीचे प्रमाण खूप वाढले आहे. डोकेदुखीचा थेट संबंध तणावाच्या पातळीशी (Stress Level) असतो. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
डोकेदुखीबद्दल संशोधन काय म्हणते
देशातील एका मोठ्या औषध कंपनीने वाढत्या डोकेदुखीवर संशोधन केले आहे. त्यानुसार 20 शहरांतील 22 ते 45 वयोगटातील 5,310 हून अधिक लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये कोरोनानंतर 93% लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या लक्षणीय वाढली आहे. डोकेदुखीचे कारण तणावाच्या पातळीशी संबंधित आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की, लोक तणावामुळे तणावग्रस्त होत आहेत आणि त्यांच्यात डोकेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. या संशोधनात सहभागी असलेल्या प्रत्येक तीनपैकी एकाने कोरोनानंतर स्वतःला अधिक तणावग्रस्त मानले आहे.
तणावाचं कारण काय?
या संशोधनात काम करणार्या आणि काम न करणार्या अशा दोन्ही लोकांचा समावेश करण्यात आला आहे. दोघांमध्ये तणावासाठी, आर्थिक समस्या आणि कामाचा दबाव वाढत्या डोकेदुखीमध्ये अग्रस्थानी आहे. याशिवाय आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक कलहही यासाठी कारणीभूत आहेत. अभ्यासाच्या अहवालात असे सुचविण्यात आले आहे की, तणावाचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. कोरोनापूर्वीच्या तुलनेत 26-35 आणि 36-45 वयोगटातील लोकांमध्ये ट्रेस पातळी 12% ते 13% वाढली आहे. 26-35 वयोगटातील तरुण सर्वाधिक तणावाखाली असल्याचे आढळून आले आहे. त्यांची संख्या 87% पर्यंत आहे.
डोकेदुखीचे सर्वात मोठे नुकसान
तणावामुळे डोकेदुखी होत असून त्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. सुमारे 40% सहभागींनी मान्य केले की, त्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. डोकेदुखीचा परिणाम व्यावसायिक ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत होताना या संशोधनात आढळून आले.
डोकेदुखीसाठी ताण का जबाबदार आहे?
जेव्हा मान आणि टाळूचे स्नायू ताणतात किंवा संकुचित होतात तेव्हा तणावग्रस्त डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. तणाव, नैराश्य, डोकेदुखी किंवा चिंता यामुळे स्नायूंचे आकुंचन होऊ शकते.
डोकेदुखी टाळण्याचे मार्ग
- पौष्टिक आहार नियमित वेळेत घ्या.
- अन्न कधीही चुकवू नका, रिकाम्या पोटी गॅस होऊ शकतो.
- नाश्ता करण्यास विसरू नका.
- रोज व्यायाम करा.
- पुरेशी झोप घ्या. कॅफिन आणि धूम्रपान टाळा.
- डॉक्टरांना विचारल्याशिवाय वेदनाशामक औषध घेऊ नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा