Agriculture News : तांदूळ आणि गहूबाबत धक्कादायक अहवाल! हानिकारक आर्सेनिक आणि शिसे याचं प्रमाण अधिक, पोषकतत्वांचीही कमतरता
Wheat and Rice Nutrients : भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याची धक्कादायक बाब अहवालात समोर आली आहे.
Wheat and Rice Nutrients : भारतात तांदूळ (Rice) आणि गहू (Wheat) ही मुख्य पिके आहेत. तसेच भारतातील जनतेचं मुख्य खाद्यही हेच आहे. यातूनच आपल्या शरीराला आवश्यक पोषकतत्वे आणि ऊर्जा पण, आता तांदूळ आणि गव्हाबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याची धक्कादायक बाब अहवालात समोर आली आहे. भारतातील तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये आवश्यक पोषक तत्वांचा तुटवडा आणि हानिकारक घटकांची वाढ झाली आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी एका संशोधनानंतर केला आहे.
तांदूळ आणि गहू संदर्भात धक्कादायक अहवाल
संशोधनानुसार, भारतातील गहू आणि तांदूळ यासारख्या पिकांमध्ये पोषकतत्त्वांची कमतरता आढळून आली आहे. शास्रज्ञांच्या एका पथकाने संशोधनानंतर एक अहवाल जारी केला आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार, धान्यामधील कॅल्शिअम, लोह आणि झिंक यासारखे पोषकतत्वांमध्ये घट झाली आहे. भारतातील धान्यामधील आवश्यक आणि पोषकतत्वांमध्ये सुमारे 19 ते 45 टक्के घट झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
आर्सेनिक आणि शिसे याचं प्रमाण अधिक
जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या अहवालानुसार, सध्या वापरल्या जाणार्या गव्हामध्ये 1960 च्या गव्हाच्या तुलनेत आर्सेनिक आणि क्रोमियमची पातळी कमी आहे. पण, आताच्या धान्यामध्ये हे प्रमाण खूप वाढलं आहे. देशभरात लागवड केलेल्या काही प्रमुख जातींच्या तांदळामध्ये 1960 च्या दशकातील धान्यांपेक्षा सुमारे 16 पट अधिक आर्सेनिक आणि चार पट अधिक शिसे आढळून आले आहेत, असं समोर आलं आहे. आर्सेनिक आणि शिसे याचं हे अधिक प्रमाण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
संशोधकांनी 1960 ते 2010 पर्यंत तांदूळ आणि गहू पिकांच्या धान्य रचनेचा अभ्यास केला. सर्वोत्कृष्ट मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या पिकांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा अहवाल मांडला आहे.
पिकांमध्ये पोषकतत्वांची कमतरता
या अहवाला निष्कर्षांवरून समोर आलं आहे की, एकीकडे हरित क्रांतीनंतर देशातील धान्य उत्पादनात वाढ झाली आहे, ज्यामुळे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली. पण त्यासोबतच, अन्नाचा अविभाज्य भाग असलेल्या तांदूळ आणि गव्हाच्या गुणवत्तेत लक्षणीय घट झाली आहे. ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब आहे.
शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा
हाडांच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह आवश्यकता असते. तसेच, प्रतिकारशक्ती,प्रजनन आणि न्यूरोलॉजिकल आरोग्यासाठी झिंक महत्त्वाचे आहे. त्यामुळे धान्यांमध्ये पोषक तत्वांची कमतरता झाल्यास त्याचा शरीरावरही परिणाम होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Breast Cancer : महिलांनाच नाही, पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; अन्यथा...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )