Breast Cancer : महिलांनाच नाही, पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; अन्यथा...
Breast Cancer in Men : ब्रिटनमधील एका पुरुषाला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं. त्याच्या ब्रेस्टमध्ये एक गाठ आढळल्यावर ही बाब समोर आली.
Breast Cancer Symptoms : महिलांमध्ये (Women) स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होणं साधारण आहे. स्तनामध्ये जास्त पेशी निर्माण झाल्यावर त्याची गाठ तयार होते. महिलांना ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer in Women) झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer in Men) झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? स्तनाचा कर्करोग फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होतो, हे बहुतेक पुरुषांना माहित नसतं. ब्रिटनमधील एका पुरुषालाही याबद्दल माहिती नव्हती आणि त्याला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. कार्डिफमध्ये राहणारा माइक रॉसिटर यालाही पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होते, हे माहित नव्हतं. त्याला ब्रेस्टमध्ये एक गाठ दिसून आली. माइक रॉसिटरला त्याच्या स्तनामध्ये एक गाठ सापडली, तोपर्यंत त्याला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल काहीही माहिती नव्हतं. पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे (Breast Cancer Symptoms) काय जाणून घ्या.
पुरुषांनाही होतो स्तनाचा कर्करोग
माइक रॉसिटरला (UK Man Diagnosed with Breast Cancer) त्याच्या छातीत काहीतरी विचित्र असल्याचे लक्षात आलं, त्याला गाठ (Lump in Nipple) दिसून आली. माइक रॉसिटर मॅरेथॉन ट्रेनिंग करताना त्याचा स्तनाग्रामध्ये गाठ दिसून आहे. हे काहीतरी वेगळं आणि गंभीर असल्याची बाब त्याच्या लक्षात आली. त्याने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली आणि त्याला स्तनाचा कर्करोग झाल्याचं कळलं.
'असं' झालं निदान
मॅरेथॉनपटू घट्ट कपडे घालतात. धावताना त्वचा आणि कपड्यांमधील घर्षणामुळे स्तनाग्रांना रॅशेज येतात, याला वैद्यकीय भाषेत रेड इलेव्हन, रोव्हर्स निपल, बिग क्यूएस असंही म्हणतात. यामुळे, स्तनाग्रातून रक्तस्त्राव सुरू होतो किंवा जखम तयार होते. यासाठी मॅरेथॉन धावपटू व्हॅसलीन लावतात. माइक रॉसिटर 2014 मध्ये मॅरेथॉन ट्रेनिंग करत असताना स्तनाग्राला व्हॅसलीन लावताना गाठ त्याच्या निदर्शनास आली.
जिद्दीनं कॅन्सरवर मात
याकडे दुर्लक्ष न करता, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तपासणी केली. तेव्हा त्यांना पहिल्यांदा समजलं की ब्रेस्ट कॅन्सर फक्त महिलांना नाही तर पुरुषांनाही होतो. याआधी त्यांनी याबद्दल ऐकलं नव्हतं. कॅन्सरचं निदान झाल्यावर त्यांनी घाबरून न जाता जिद्दीनं त्यावर मात केली. माइक आता यातून बरे झाले असून ते इतर पुरुषांना याबाबत जागरूक करतात.
99 टक्के पुरुष याबाबत अज्ञान
अजूनही 99 टक्के पुरुषांना हे माहीत नाही की, पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. माईक यांनी सांगितलं आहे की, लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. जितक्या लवकर याचं निदान होईल तितके चांगलं आहे.
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे
पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या मुख्य लक्षणांमध्ये निप्पलच्या मागे गाठ, स्तनाग्र उलटे होणे, छातीवर पुरळ आणि काखेखाली ढेकूळ यांचा समावेश होतो. या सारखी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health Tips : शरीरात सूज येण्याला तुमच्या 'या' वाईट सवयी कारणीभूत! गंभीर आजाराचं लक्षण; आजच बदल करा नाहीतर...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )