Healthy Lifestyle : 'या' 10 कारणांमुळे बहुतेक लोक गंभीर आजाराला बळी पडतात, तुम्हीही दुर्लक्ष करताय का?
Health Care Tips : 'या' 10 आरोग्यासंबंधित समस्यांमुळे दरवर्षी जगातील अनेक लोकांचा मृत्यू होतो. आपल्या जीवनशैलीत आणि सवयींमध्ये वेळीच योग्य बदल केले तर ते टाळता येऊ शकतात.
Health Care Tips : जगात असे काही आजार आहेत ज्यांमुळे बहुतेक लोक आजारी पडतात. हे आजार फक्त गरीब देशांतील लोकांनाच होत नसून हे काही प्रकारच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आहेत, ज्यामुळे विकसित आणि समृद्ध देशांतील लोक यांना जास्त बळी पडतात. आम्ही तुम्हांला आरोग्यासंबंधित समस्यांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे दरवर्षी जगातील अनेक लोकांचा मृत्यू होतो. तुम्ही आपल्या जीवनशैलीत आणि सवयींमध्ये वेळीच योग्य बदल केले तर ते टाळता येऊ शकते.
1. अकाली वृद्धत्व
जगभरातील लोकांना अकाली वृद्धत्व म्हणजे वयाआधी वृद्धत्व येण्याची समस्या सतावते. या शारीरिक समस्येची दोन मुख्य कारणे आहेत, पहिलं कारण शारीरिक हालचाल नसणे आणि दुसरं म्हणजे अन्नातील पोषणाचा अभाव. जे लोक एकाच जागी तासनतास बसतात किंवा बसून काम करत असतात, त्यांच्या शरीरात अनेक आजार निर्माण होऊ लागतात.
2. लठ्ठपणा
लठ्ठपणा ही अशी एक समस्या आहे ज्यामुळे जगातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या त्रस्त आहेत. लठ्ठपणा एक आजार नसला तरी त्यामुळे अनेक जीवघेणे आजार होण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ, मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्ताशयाशी संबंधित आजार, हृदयविकाराचा झटका, स्लीप एपनिया आणि कर्करोग इ.
3. तंबाखूचे व्यसन
तंबाखूचे व्यसन हे अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे. या वाईट सवयीमुळे संपूर्ण जगात दरवर्षी लाखो जण जीव गमावतात. गुटखा, बिडी, सिगारेट, शिगार किंवा इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन केल्याने शरीर आतून पोकळ होते. केवळ कर्करोगच नाही तर त्याचे सेवन केल्याने अनेक घातक मानसिक आजारही होतात, जे अकाली मृत्यूचे कारण बनतात.
4. काही वाईट सवयी
अशा अनेक वाईट सवयी आहेत, ज्यामुळे तुम्ही आजार आणि अकाली मृत्यूला बळी पडू शकता. ड्रग्ज घेणे, नशा करणे, जास्त मद्यपान करणे या सवयींवर वेळीच नियंत्रण मिळवले तर दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जगता येते.
5. एड्स
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एड्सचा प्रसार तरुण लोकांपेक्षा 50 वर्षे किंवा या वयाच्या आसपासच्या लोकांमध्ये जास्त वेगाने होतो. याचे कारण म्हणजे या लोकांचे शरीर आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते. दरम्यान, केवळ विकसनशील देशांमध्येच नाही तर युनायटेड स्टेट्स सारख्या विकसित देशांमध्येही लोक एड्स आजाराबाबत तपासणी आणि सतर्कतेकडे फारसे लक्ष देत नाहीत. यामुळे, जोपर्यंत या रोगाची लागण होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
6. मानसिक आजार
जगभरातील लोकांना स्मृतीभ्रंशापासून ते झोपेच्या विकारापर्यंत अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजारांनी ग्रासले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा आजार म्हणजे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य आहे. ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. नैराश्यासारख्या मानसिक समस्यांमुळे जगात दररोज शेकडो लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे यापैकी बहुतांश घटनांमध्ये कुटुंबातील सदस्यांना या गंभीर आजाराबाबत माहिती नसते.
7. दुखापत आणि हिंसा
कौटुंबिक हिंसाचार, रस्ते अपघात यांसारख्या घटनांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने लोक मृत्यूला बळी पडतात. या दोन्ही समस्या टाळता येतात. या व्यतिरिक्त जर वृद्धांबाबत बोलायचो झाले तर, एका सर्वेक्षणानुसार 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन वृद्धांपैकी एकाचा दरवर्षी पडण्यामुळे मृत्यू होतो. ही परिस्थिती कोणत्याही विशिष्ट देशाची नसून संपूर्ण जगाची स्थिती आहे.
8. श्वसनाचे रोग
वाढते प्रदूषण आणि खालावत चाललेली हवेची गुणवत्ता यामुळे दरवर्षी लाखो लोक श्वसनाच्या आजारामुळे अकाली मृत्यूला बळी पडतात. ज्या ठिकाणी हवेत ऑक्सिजनची कमतरता असते अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना श्वसनासोबतच मेंदू आणि झोपेशी संबंधित अनेक आजार असतात, जे अकाली मृत्यूचे कारण बनत आहेत.
9. प्रतिकारशक्ती कमकुवत होणे
योग्य आहाराचा अभाव, शारीरिक श्रमाचा अभाव आणि योग्य जीवनशैली नसल्यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे इन्फ्लूएंझा आणि न्यूमोनियासारख्या आजारांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त असते.
10. नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष
आजही जगातील बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याबाबत तितकेसे जागरूक दिसत नाहीत. नियमित आरोग्य तपासणीअभावी वय आणि जीवनशैलीमुळे त्यांना अनेक आजार होतात आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यूही होतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Health Tips : उन्हाळ्यात 'या' 5 भाज्यांचे करा सेवन, शरीर राहील थंड, रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )