Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
Health Tips : जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सक्रिय राहायचे असेल, तर आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून मेंदू निरोगी आणि सक्रिय राहील.
Health Tips : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे काही लोकांच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होत आहे. काही लोक चिंता आणि झोप न लागण्याच्या समस्येने देखील त्रस्त आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मेंदू सक्रिय बनवू शकता. चला तर, जाणून घेऊया...
भोपळ्याच्या बिया : मेंदूला निरोगी आणि सक्रिय बनविण्यासाठी भोपळ्याच्या बियाही फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय यात अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, कॉपर आणि आयर्नही मुबलक प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बिया मेंदूला ऊर्जा देतात. यामुळे विचार करण्याची क्षमता सुधारते, तसेच मेंदूचा विकासही चांगला होतो.
अक्रोड : मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज अक्रोड खावेत. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण बनवतो आणि निरोगी ठेवतो. अक्रोडमध्ये असे पोषक घटक असतात, ज्यामुळे मेंदू सक्रिय होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, मॅंगनीज आणि अँटिऑक्सिडंट असतात.
अंडी : अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. अंडी हे शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम अन्न आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीनसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूला निरोगी ठेवतात. व्हिटॅमिन बी उदासीनता आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते. तर, त्यातील कोलीनमुळे मेंदूची शक्ती वाढते.
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटचे सेवन मेंदूसाठीही खूप फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्यासाठी जेवढे स्वादिष्ट आहे, तेवढेच त्याचे अनेक फायदेही आहेत. कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. याच्या सेवनाने चिंता, तणाव आणि नैराश्य दूर होते.
हिरव्या भाज्या : मेंदूसह शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करावा. हिरव्या भाज्या खाल्ल्याने मेंदूला पोषण मिळते. यासाठी आहारात पालक, ब्रोकोली आणि केल यांसारख्या भाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन यांसारखे पोषक घटक असतात, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
ग्रीन टी : शारीरिक आरोग्याबरोबरच तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले असले पाहिजे. ग्रीन टीमध्ये असणारी पोषक तत्वे तुमची बौधिक क्षमता वाढवण्यास मदत करतात. तसेच ग्रीन-टी प्यायल्यानंतर तुम्हाला झोप देखील लागणार नाही. ग्रीन-टीमध्ये कॅटेचिन नावाचे अॅंटीऑक्सीडेंट असते, जे आपण जे पदार्थ खातो, त्यामधील कलेस्ट्रॉल शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी करते. त्यामुळे जे लोक दिवसातून दोन वेळा ग्रीन टी पितात त्यांना ह्रदया संबंधितचे आजार होत नाहीत.
संत्री : एका संत्रात जवळपास तुम्हाला संपूर्ण दिवसभरात आवश्यक असणारे सर्व व्हिटॅमिन सी मिळते. संत्र हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण यामध्ये मानसिक घट रोखण्यासाठी व्हिटॅमिन सी हा एक महत्वाचा घटक आहे.
ब्रोकोली : मानसिक ताणतणावामुळे अनेक माणसं नैराश्याच्या आहारी जातात. शरीरात फॉलिक आॅसिडचे प्रमाणात कमी झाल्यामुळेदेखील नैराश्य येण्याची शक्यता असते. मात्र, ब्रोकोली खाण्यामुळे तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. याचे कारण असे की ब्रोकोलीमध्ये फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश आणि उत्साही वाटते.
हळद : चिंता, ताणतणावाची समस्या कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटी एंग्झायटीचे गुण आहेत. ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. तसेच यातील अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.
ब्लूबेरी : ब्लूबेरी मेंदूच्या विकासास मदत करतात. यामध्ये आढळणारे जीवनसत्त्व, खनिजे आणि फायटो न्यूट्रीएंट मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. त्याचबरोबर सेंट्रल नर्व्हस सिस्टमचे आरोग्य देखील राखते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
- Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )