Cancer: भारतात पोटाच्या कर्करोगाचे मुख्य कारण माहितीय? अनेकांना माहित नाही, 'या' सवयी त्वरित बंद कराव्यात, आरोग्य तज्ज्ञ सांगतात..
Cancer: भारतातील पोटाच्या कर्करोगाची रुग्णसंख्या वाढतेय. आपल्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी यास कारणीभूत आहेत. याबद्दल अनेकांना माहित नाही.
Cancer: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आणि प्रामुख्याने कर्करोगाचा सर्वाधिक धोका लोकांना दिसून येतोय. सध्या भारतात पोटाचा कर्करोग हा चिंतेचा विषय बनला आहे. या देशातील पुरुषांमध्ये हा पाचवा आणि महिलांमध्ये सातवा सर्वात सामान्य कर्करोग आहे. तर, जगभरात कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे हे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतात पोटाच्या कर्करोगाच्या वाढती रुग्णसंख्या पाहता आपल्या सध्याच्या जीवनशैलीतील अनेक घटक कारणीभूत ठरले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यासोबतच फ्रीज केलेले अन्न, सिगारेट आणि हेवी अल्कोहोल यांसारख्या जीवनशैलीतील घटकांना कारणीभूत आहेत. काळी मिरी आणि लाल मिरचीमध्ये आढळणारे Capsaicin पोटाच्या भागात जळजळ निर्माण करू शकते आणि पोटातील ऍसिडचे उत्पादन वाढवू शकते. त्यांचे सतत सेवन केल्याने पोटात जळजळ आणि सूज येऊ शकते, ज्यामुळे कालांतराने कर्करोगाचा विकास होऊ शकतो. पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे जाणून घेऊया.
पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
- पोटदुखी, विशेषतः पोटाच्या वरच्या भागात
- पोटात सूज येणे
- वजन कमी होणे
- उलट्या होणे
- मळमळ
- अन्न गिळण्यात अडचण
- पोटात रक्तस्त्राव
- शौच काळ्या रंगाचा किंवा रक्त येणे
पोटाच्या कर्करोगाचा धोका कसा कमी करायचा?
निरोगी आहाराचा अवलंब करा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी, दररोज आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा, त्यासोबत मीठ आणि लाल मांसाचे सेवन कमी करा. बीटा-कॅरोटीन आणि कॅरोटीनॉइड्स तसेच लिंबूवर्गीय फळे, पालेभाज्या, गाजर यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा.
तंबाखू आणि सिगारेटचे सेवन करू नका
तंबाखू आणि सिगारेटचे सेवन न केल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे चुकूनही या गोष्टींचे सेवन करू नका. पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर बंद करा.
वजन नियंत्रणात ठेवा
वजन टिकवून ठेवण्यासाठी दैनंदिन शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहा, जे संपूर्ण आरोग्यास समर्थन देते आणि शरीराची रोगाशी लढण्याची क्षमता वाढवते.
हेही वाचा>>>
Weight Loss: कोणत्याही मेहनतीशिवाय...अगदी सहज...महिलेनं तब्बल 19 किलो वजन कमी केलं? सीक्रेट केले शेअर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )