Health : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता? तर सावधान! आरोग्याला होणारे नुकसान जाणून घ्या
Health : उन्हातून घरी आल्यानंतर काहीजण थेट फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढून पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का? ही काही सामान्य गोष्ट नाही. ही हलक्यात न घेता गंभीर बाब आहे.
Health : मे महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याने इशारा दिलाय. अशावेळी कामानिमित्त काही लोकांना घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो. अशात भर उन्हातून जेव्हा घरी परततो, तेव्हा आपल्याला एवढी तहान लागते, की काहीजण थेट फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढून पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का? ही काही सामान्य गोष्ट नाही. ही हलक्यात न घेता गंभीर बाब आहे. कारण यामुळे आरोग्याला होणारे नुकसानही तितकेच आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की भर उन्हातून घरी आल्यावर फ्रीजमधील थंड पाणी पिल्यास नेमकं काय होतं?
थंड पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्त्वाचे
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आचार्य मनीष यांनी याबद्दल माहिती दिलीय. ते म्हणतात, उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने काही लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करतात, ज्यामध्ये सामान्य पाण्याबरोबरच लोक लस्सी, ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासह विविध प्रकारची पेये पितात. परंतु आयुर्वेदाचार्यांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पण पाणी पिताना योग्य तापमान असणेही महत्त्वाचे आहे. पाण्याच्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यासाठी रेफ्रिजरेटरचे पाणी पितात. तहान शमवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी लोक नेहमी थंड पाणी पितात, यामुळे उष्णतेपासून काही काळ आराम मिळत असला तरी त्यामुळे खूप नुकसानही होते. आयुर्वेदात थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक मानले गेले आहे. विशेषतः फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊ नये. उन्हातून बाहेर पडल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणे शरीरावर वाईट परिणाम करते. जर तुम्हीही उन्हाळ्यात चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने थंड पाण्याचे सेवन करत असाल तर, त्यामुळे तुमच्या आरोग्याला काय नुकसान होते? जाणून घ्या
पचनावर परिणाम
शरीर कोणताही पदार्थ सेवन केल्यास त्याला स्वतःच्या तापमानात आणते, जे ते पचनासाठी पुढे पाठवते, परंतु अत्यंत कमी तापमानाच्या वस्तूंचे सेवन केल्याने शरीर स्वतःच्या तापमानाशी जुळवून घेण्यास सुरुवात करते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या उद्भवते. पोटात थंड पाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, थंड पाणी पिल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पचनात समस्या निर्माण होतात.
घसा खवखवणे
थंड पाणी प्यायल्यास अनेकदा घसा खवखवणे किंवा आवाजात बदल झाल्याचे दिसून येते. फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर थंड पाणी पिल्याने असा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे. दुसरीकडे, जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास, कफ तयार होऊ लागतो आणि श्वासोच्छवासाचे मार्ग अवरोधित होतात. त्यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशात सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हृदय गतीवर परिणाम
थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील हृदय गती कमी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, रेफ्रिजरेटरचे खूप थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह उत्तेजित होतात. नसा शरीराच्या अनैच्छिक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. कमी तपमानाचे पाणी थेट वॅगस मज्जातंतूवर परिणाम करते, ज्यामुळे हृदय गती कमी होते.
डोकेदुखी समस्या
उन्हातून बाहेर पडल्यानंतर लगेचच खूप थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्यास मेंदू फ्रीझ होऊ शकतो. थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मणक्याच्या अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते. ही परिस्थिती सायनसच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी समस्या वाढवू शकते.
थंड पाण्यामुळे वेट लॉस करण्यात अडचण
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्यामुळे वेट लॉस करमे कठीण होते. रेफ्रिजरेटरच्या पाण्यामुळे शरीरातील चरबी जड होते, त्यामुळे चरबी कमी होण्यास त्रास होतो आणि वजन कमी होत नाही.
हेही वाचा>>>
Child Health : पालकांनो..मोबाईलच्या व्यसनानं लहान वयातच मुलं होतायत 'सर्वाइकल पेन' चे शिकार, 'ही' लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )