(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DENV-2 : डेंग्यूचा नवा व्हेरियंट आढळला; काळजी घ्या, अन्यथा... तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
डेंग्यूच्या नव्या व्हेरियंटची ओळख पटली असून केरळ, महाराष्ट्र, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडु आणि कर्नाटकात याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
DENV-2 : डेंग्यूचा नवा व्हेरियंट DENV-2 बाबत डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आतापर्यंतचा डेंग्यूचा घातक व्हेरियंट केरळसह 11 राज्यांमध्ये आढळून आला. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढच्या वाढीबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, डेंग्यू व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण होणाऱ्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच हा व्हेरियंट अत्यंत घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
डेंग्यूचा नवा व्हेरियंट DENV-2
केरळ, महाराष्ट्र, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडु आणि कर्नाटकात डासांमुळे होणाऱ्या व्हायरल संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. दरम्यान, मान्सूनमध्ये साधारणतः डेंग्यूची साथ डोकं वर काढतेच. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेंग्यू व्हायरस, DENV-2 किंवा D2 स्ट्रेन धोकादायक असण्यासोबतच लागण झालेल्यांच्या शरीराचं अधिक नुकसानही होतं. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डीजी बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे की, स्ट्रेन विशेषतः घातक आहे आणि यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची अधिक शक्यता असते.
तज्ज्ञांनी दिला इशारा
DENV मुळे चिंता करण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रकरणांचे गांभीर्य. अनेक राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही राज्य जसं उत्तर प्रदेश आणि केरळात डेंग्यूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच यापैकी अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं अनेक लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, बहुतांश वेळी DENV स्ट्रेन तीव्र किंवा हलक्या तापाचं कारण ठरतो. परंतु, D2 चा संबंध आल्यामुळे रुग्णांमध्ये अनेक गंभीर आणि तीव्र लक्षणं दिसून येतात. वेळीच जर ही लक्षण ओळखली नाहीत, तर मृत्यूही होऊ शकतो.
प्रामुख्यानं डेंग्यू व्हायरस हा अत्यंत घातक आहे. हा व्हायरस चार रुपांत D1, D2, D3 आणि D4 मध्ये आकार घेतो. DENV चा कोरोना प्रमाणेच संसर्ग होतो. यामुळे रुग्णाच्या शरीरात डेंग्यूचा प्रसार वेगानं होतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अधिक चिंताजनक डेंग्यू स्ट्रेनच्या उपस्थितीचा अर्थ असा होऊ शकतो की ज्या लोकांना आधी संसर्ग झाला होता, त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )