Health Tips : चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर सुटका मिळवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय
Health Tips : अँटिऑक्सिडंट गुणधर्माने भरपूर असलेले मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

Health Tips : वृद्धत्वामुळे त्वचेवर सुरकुत्या (Wrinkles) दिसणे ही एक सामान्य समस्या आहे. सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला महागडे ब्युटी ट्रीटमेंट घेतात, काही वेळा त्याचे त्वचेवर दुष्परिणामही होतात. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचीही (Home Remedies) मदत घेऊ शकता. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि सुरकुत्याही कमी होतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय नेमके कोणते आहेत ते जाणून घ्या.
मध (Honey)
अँटिऑक्सिडंट गुणधर्माने भरपूर असलेले मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला सुरकुत्या दूर करायच्या असतील तर चेहऱ्यावर मध लावा, पातळ थर तुमच्या चेहऱ्यावर पसरवा. सुमारे 20-30 मिनिटे हे मध चेहऱ्यावर ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
कोरफड जेल (Aloe Vera)
कोरफडमध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते. सुरकुत्या कमी करण्यासाठी, दररोज कोरफड जेलने तुमच्या चेहऱ्याची मालिश करा.यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतील.
खोबरेल तेल (Coconut Oil)
हे तेल फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध आहे जे त्वचेचे पोषण करण्यास उपयुक्त आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करणे आवश्यक आहे.
ऑलिव तेल (Olive Oil)
ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. सुरकुत्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करू शकता. काही वेळाने तुमचा चेहरा पाण्याने धुवा.
केळी (Banana)
केळीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळतात. जे सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त आहे. यासाठी एका वाटीत एक पिकलेले केळे मॅश करा, त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला मसाज करा आणि सुमारे 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
दही (yogurt)
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. दह्याने चेहऱ्याला मसाज करा, काही मिनिटे राहू द्या, नंतर चेहरा पाण्याने धुवा.
अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याची काळजी घेतली तर वेळीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवेल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
