Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील
Hair Oil : बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे.
![Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील hair oil use these hair oils to strengthen hair you will get good benefits marathi news Hair Oil : केस घनदाट करण्यासाठी 'या' केसांच्या तेलाचा वापर करा; आश्चर्यकारक फायदे मिळतील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/05/5973d0cc3a8f19f9093b4087ebdebb491675607320775358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hair Oil : केसांच्या वाढीसाठी केसांना तेल लावणं आवश्यक आहे. पण त्यासाठी योग्य केसांचं तेल मिळणं गरजेचं आहे. जे आपल्या केसांचे पोषण करेल आणि गरम पाण्याने येणारा कोरडेपणा दूर करू शकेल. बाजारात अनेक प्रकारचे हेअर ऑईल मिळतात. पण, सगळेच आपल्या केसांसाठी चांगले असतात असं नाही.
केस मजबूत करण्यासाठी 'हे' तेल वापरा
भृंगराज तेल
भृंगराज तेल हे आयुर्वेद वैद्यक तसेच वैद्यक शास्त्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. या तेलाची खरोखरच उत्तम गुणवत्ता म्हणजे ते आपल्या त्वचेसाठी आणि विशेषतः केसांसाठी चांगले आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन ई कोरड्या आणि सूजलेल्या त्वचेला आराम देण्यास मदत करते. भृंगराज तेल डोक्यातील कोंडा आणि कोरड्या टाळूवर उपचार करण्यास मदत करते, केस गळणे कमी करते, केसांची चमक वाढवते, केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि अकाली पांढरे होणाऱ्या केसांना प्रतिबंध करते. तुम्ही हे तेल फक्त गरम करून तुमच्या टाळूवर आणि मुळांना नीट लावा. केस धुण्यापूवी 30 मिनिटं केसांना तेल लावून ठेवा.
बदाम तेल
बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा -3 फॅटी ऍसिड इत्यादी भरपूर असल्याने ते अत्यंत पौष्टिक असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच केसांना पोषण आणि मजबूत करण्यास, त्यांची रचना सुधारण्यास आणि केसांना चमक देण्यास मदत होते. तुमच्या तळहातात अर्धा चमचा बदामाचे तेल घ्या आणि दोन्ही तळवे एकमेकांना हलक्या हातांनी चोळा आणि केसांना हलका मसाज करा. केस धुण्यापूर्वी साधारण 1-2 तास आधी हे तेल लावून ठेवा.
खोबरेल तेल
खोबरेल तेल हे सर्वात लोकप्रिय तेल आहे. अनेक वर्षानुवर्ष लोक या तेलाचा वापर करतात. यामुळे केस मजबूत, घनदाट आणि चमकदार बनवण्यास मदत होते. खोबरेल तेलाचा हलका मसाज केल्याने केसांच्या कूपांमध्ये रक्ताभिसरण होते आणि केसांचा पोत मऊ होतो. तुम्ही खोबरेल तेलाबरोबर कढीपत्तादेखील वापरू शकता. यासाठी ताज्या कढीपत्त्यात खोबरेल तेल घाला आणि उकळवा. त्याला काळा रंग येईपर्यंत हे तेल गरम करा. त्यानंतर मिश्रण थंड करा आणि नंतर केसांच्या टाळूवर लावा. तासभर राहू द्या आणि नंतर केस धुवा. हे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तुम्ही करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)