एक्स्प्लोर

Fashion: गळ्यात हिऱ्यांचा हार...डायमंड ब्रेसलेट...लाल साडी अन् टिकलीने वेधलं लक्ष...नीता अंबानींचा लूक म्हणजे कमालच!

Fashion: नेहमीप्रमाणेच यावेळीही नीता अंबानी यांचा लूक पूर्णपणे ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होता. विशेष म्हणजे हिऱ्यांचा हार, डायमंड ब्रेसलेट, लाल साडी अन् टिकलीने सर्वांचं मन वेधून घेतलं.

Fashion: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) नेहमीच कलागुणांना वाव देतात, आणि ज्याचा संबंध देशाला गौरव मिळवून देण्याशी असतो. तिथे त्या आवर्जून समर्थन देतात. अलीकडेच, प्रथम नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी भारताची प्रतिनिधी म्हणून निवड झाली. यानंतर आता त्यांनी ऑलिम्पियन आणि पॅरालिम्पियन्ससाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत नीता अंबानींचा लूकही अप्रतिम दिसत होता. या खास प्रसंगी, त्यांनी त्यांचा आवडता पोशाख म्हणजेच साडी परिधान केली होती. नेहमीप्रमाणेच यावेळीही नीता यांचा लूक पूर्णपणे ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होता.

लाल साडीतील नीतांचे सौंदर्य पाहण्यासारखे..!

नीता अंबानी यांनी पार्टीसाठी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली लाल रंगाची साडी निवडली होती, ज्यामध्ये त्या ग्लॅमरस दिसत होत्या, दुसरीकडे त्यांचे सौंदर्य नेहमीप्रमाणे खुलून दिसत होते. नीता यांनी लाईट वेट साडी पारंपारिकपणे नेसली होती. हा पारंपारिक पोशाख पूर्णपणे साधा असला तरी, त्यांच्या साडीच्या बॉर्डरवर अतिशय सुंदर असं इंट्रिकेट सीक्वन वर्क जिओमैट्रिकल पॅटर्नमध्ये डिझाइन केले होते, यामुळे साडीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

डायमंड नेकलेस... डायमंड ब्रेसलेटने खुलले रुप

या लूकमध्ये नीता अंबानी जे दागिने परिधान करताना दिसल्या, ती यापूर्वी त्यांनी कधीच परिधान केली नव्हती. अशात मिसेस अंबानींनी त्यांच्या कलेक्शनमध्ये नवीन दागिन्यांची भर घातली आहे, असं मानता येईल. यावेळी त्यांचा हार कमी लांबीचा होता. त्यात मधोमध पिवळ्या हिरा दिसत होता. हिऱ्याच्या अगदी खाली बोटीच्या आकाराचा नमुना होता, जो लहान हिऱ्यांनी सजलेला होता. नीता अंबानींनी घातलेले कानातले हे मॅचिंग होते. त्यांच्या बांगड्याही पांढऱ्या आणि पिवळ्या हिऱ्यांना मॅच करत होत्या.

Fashion: गळ्यात हिऱ्यांचा हार...डायमंड ब्रेसलेट...लाल साडी अन् टिकलीने वेधलं लक्ष...नीता अंबानींचा लूक म्हणजे कमालच!

कपाळावर लाल टिकली, क्रिस्टलने सजलेली सुंदर पर्स

नीता अंबानी यांच्या लूकला फिनिशिंग देण्यासाठी, त्यांनी साडीला मॅचिंग हाफ-स्लीव्ह ब्लाउज परिधान केला होता. त्याची मागील रचना खूपच मनोरंजक होती. मेकअपसोबतच कपाळावरची लाल टिकली नीता अंबानी यांना आणखीच सुंदर लूक देत होती.  यासोबतच मिसेस अंबानींच्या हातात फुलांच्या आकारांनी सजलेली क्लच पर्स दिसली. त्यावर क्रिस्टलचे वर्क होते. त्याचा रंग नीतांच्या साडीच्या एम्ब्रॉयडरीशी तंतोतंत जुळला. 

हेही वाचा>>>

Fashion: 18व्या शतकातील मुघल कलेशी प्रेरित ड्रेस, पायात लाखांची हिल्स, राजकुमारीनं जिंकलं मन! BOF 500 Gala मध्ये ईशा अंबानीचा जलवा

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget