(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुले आणि कोहली फॅमिलीची धमाल कॉमेडी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा प्रोमो पाहून खळखळून हसाल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये कोहली फॅमिली आणि समीर चौघुले (Samir Choughule) यांची धम्माल कॉमेडी बघायला मिळत आहे.
Maharashtrachi Hasyajatra: शिवाली आवली कोहली,बिवाली आवली कोहली,पावली आवली कोहली,आवली लवली कोहली या कोहली फॅमिलीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या कोहली फॅमिलीच्या डायलॉग्सचे रील्स अनेक नेटकरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ही कोहली फॅमिली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नुकताच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कोहली फॅमिली आणि समीर चौघुले (Samir Choughule) यांची धम्माल कॉमेडी बघायला मिळत आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, कोहली फॅमिली ही घे भरारी या कार्यक्रमात आली आहे. या कार्यक्रमात समीर त्यांचे स्वागत करतो. त्यानंतर समीर हा शिवाली कोहलीला विचारतो, 'तुला काय व्हायचंय आहे?' यावर शिवाली म्हणते, 'मला व्हायचंय आवली' तर आवली कोहली म्हणतो, 'मी माझ्यासारखी मिशी तुला लावली.' हा डायलॉग ऐकून सर्वजण हसायला लागतात. या प्रोमोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत अभिनेता भरत जाधव दिसत आहे. हा प्रोमो समीर चौघुलेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रेक्षक कोहली फॅमिलीची धम्माल कॉमेडी आज रात्री 9 वाजता पाहू शकतात. समीरनं शेअर केलेल्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आमची सर्वात आवडती सीरिज' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आम्ही वाट बघतोय 9 वाजण्याची'
View this post on Instagram
कोहली कुटुंबाला मिळाली प्रेक्षकांची पसंती
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामध्ये कोहली कुटुंबातील सदस्यांची भूमिका प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर हे साकारतात. कोहली कुटुंब आणि समीर यांची कॉमेडीची जुगलबंदी प्रेक्षकांची मनं जिंकती. कोहली कुटुंबाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :