Marathi Actresses Tattoos: हृता दुर्गुळे ते सायली संजीव; या अभिनेत्रींच्या टॅटूचा अर्थ माहितीये?
अनेक मराठी अभिनेत्रींनी देखील टॅटू काढले आहेत. त्यांच्या टॅटूचा अर्थ आणि डिझाइनबाबत जाणून घेऊयात...

Marathi Actresses Tattoos: अनेकांना टॅटू काढायची आवड असते. आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी तसेच आपल्या पेट डॉग किंवा कॅटसाठी अनेक जण टॅटू काढतात. काही लोक आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू काढतात तर काही लोक विविध डिझाइन्सचा टॅटू काढतात. अनेक मराठी अभिनेत्रींनी देखील टॅटू काढले आहेत. त्यांच्या टॅटूचा अर्थ आणि डिझाइनबाबत जाणून घेऊयात...
हृता दुर्गुळेचा टॅटू
हृतानं अनेकवेळा तिचा टॅटू फ्लाँट केला आहे. तिने तिच्या हातावर 'hdp' अक्षरांचा टॅटू केला आहे. 'hdp' चा अर्थ Hruta, Dhruvi आणि Purva असा आहे. ध्रुवी आणि पूर्वा या हृताच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत.
View this post on Instagram
सखी गोखलेचा टॅटू
'ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातिल एक वीराणी,गगनात विऱ्सजित होता डोळ्यात कशाला पाणी' असं लिहिलेला टॅटू सखी गोखलेनं काढला आहे. एक पोस्ट शेअर करुन सखीनं या टॅटूबाबत माहिती दिली होती. सखीनं टॅटूचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी बाबांनी लिहिलेल्या शेवटच्या ओळी होत्या. त्याने आमच्या घराच्या दाराच्या मागच्या बाजूला लिहिले. जेव्हा आम्ही घराचे renovation केले तेव्हा माझ्या आईने तो दरवाजाचा तुकडा कापायला लावला. माझ्याकडे अजूनही तो तुकडा आहे.'
View this post on Instagram
सायली संजीवचा टॅटू
सायली संजीवनं एका पक्षाची डिझाइन असलेला टॅटू काढला आहे. या टॅटूचा फोटो सायलीनं सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'हे तुमच्यासाठी बाबा'
View this post on Instagram
मिताली मयेकर, जुई गडकरी,अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींनी देखील टॅटू काढला आहे. या अभिनेत्रींनी त्यांच्या टॅटूचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या
पहिला सेलिब्रिटी क्रश कोणता? 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रींनी दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
