Ashok Mama Colours Marathi Serial Track: अशोक मामांच्या विरोधात भैरवीचा नवा डाव; मुलांची कस्टडी मिळवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील?
Ashok Mama Colours Marathi Serial Track: अनिश भैरवीशी लग्नासाठी तयार होईल का? भैरवी मुलांची कस्टडी मिळवू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ashok Mama Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) अशोक मा.मा. (Ashok Mama) मालिकेत सध्या अशोक मा.मा. नोकरी मिळविण्यासाठीची धडपड सुरू आहे. नोकरीसाठी सुरू असलेली ही वणवण कधी संपणार याचीच प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे, अशोक मामांच्या विरोधात भैरवी नवा डाव आखते आहे. भैरवीला कळतंय की, इरा आणि ईशान सोसायटीमध्ये पुस्तके विकत होती आणि यावरूनचं तिचा तिळपापड होतो आणि ती तिच्या बाबांना गळ घालते की, तिला मुलांना आणण्यासाठी मदत करा.
भैरवी घरी जाते सांगते की, ती मुलांना घेऊन जाणार. मामा त्याला सहमती दर्शवतात. ईरा आणि ईशान मात्र मा.मांसोबत राहतात आणि संयमी भैरवी सोबत तिच्याकडे जाते. पण, भैरवीला मात्र ईरा आणि ईशानची देखील कस्टडी हवी आहे आणि त्यामुळेच ती अनिशला लग्नासाठीची विचारणा करते.
भैरवीवर अशोक मा. मांना बऱ्याचदा संशय देखील येतो की, नक्की हिचा डाव काय असणार आहे? कारण याआधी मुलांची कस्टडी मिळविण्यासाठी भैरवीनं अनेक प्रयत्न केले आहेत. संयमी भैरवीकडे आहे आणि ईरा, ईशान मामांकडे. एकमेकांपासून दुरावल्यानं तिघांनाही एकमेकांची आठवण येते. ईरा मामांना मोबाईलवर व्हिडीओ कसा करायचा? ते शिकवते आणि मामा संयमीला घरी परत ये असा व्हिडीओ पाठवतात. त्यांचा व्हिडीओ बघून संयमी परत घरी परत येते. भैरवी आता दुसरा प्लॅन करायचं ठरवते त्यासाठी वकिलांना जाऊन भेटते. भैरवी अनिशला भेटते आणि सांगते की, मामांच्या विरोधात मुलांना आणण्यासाठी मला मदत कर. आपण दोघं मिळून हे करूया.
दुसरीकडे, मामा अजूनही नोकरी शोधत आहेत पण मिळत नाहीये. पण तरीदेखील घरी परतल्यावर अशोक मा. मा मुलांसोबतछान रमले आहेत, मामा मुलांना जुन्या गोष्टी सांगत आहेत. मामा मुलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ पडली तर, त्यांना शिक्षा देखील आहेत कारण त्यांच्यासाठी शिस्त म्हणजे शिस्त नाही का? मामा आणि मुलांमधील काही गोड क्षण, त्यांच्यातील बॉण्डिंग देखील पाहायला मिळत आहे. तसेच, फुलराणी आणि मामांमधील जुगलबंदी मालिकेत बघायला मिळत आहे. हे सगळं सुरू असताना भैरवी वेगवेगळे कट रचतेय की कशी मुलांना मामांपासून तोडेल.
दरम्यान, आता अनिश भैरवीशी लग्नासाठी तयार होईल का? भैरवी मुलांची कस्टडी मिळवू शकेल का? भैरवीचे कट यशस्वी होतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

