Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका रोमॅंटिक वळणावर; अरुंधती आशुतोषला म्हणणार का 'आय लव्ह यू'?
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे.

Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा समावेश करण्यात आला आहे. अरुंधती आणि आषुतोष नुकतेच लग्नबंधनात अडकले असून आता या मालिकेत रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. अरुंधती आशुतोषला 'आय लव्ह यू' बोलणार का याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
अरुंधती आणि आशुतोषच्या गोड संभाषणाने वेधलं लक्ष
'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. यात अरुंधती शिरा बनवताना दिसत आहे. दरम्यान वेलदोडे मिळत नसल्याने ती आशुतोषला फोन करते. अरुंधती आशुतोषला म्हणते,"वेलदोडे हवे होते. सुलेखाताई म्हणत आहेत, तुम्ही सारखी स्वयंपाकघरात लुडबुड करता आणि सर्व गोष्टींच्या जागा बदलता. यावर आशुतोष म्हणतोय,अच्छा..असं म्हणाली का आई आता मी तुला सांगतोच वेलदोडे नक्की कुठे ठेवले आहेत".
View this post on Instagram
आशुतोष पुढे म्हणतो,"शेकडीकडे तोंड करुन उभी असशील तर मागे काचेचं दार असलेलं जे कपाट आहे. त्या कपाटात काचेच्या छोट्या तीन बरण्या आहेत. त्यातल्या एका काचेच्या बरणीत वेलदोडे आहेत". त्यानंतर अरुंधती आशुतोषला वेलदोडे मिळाल्याचं सांगते.
दरम्यान आशुतोष अरुंधतीला म्हणतो,"ऐक ना काय करत आहेस?". त्यावर उत्तर देत अरुंधती आशुतोषला म्हणते, "काही नाही गोडाचा शिरा". लगेचच आशुतोष अरुंधतीला म्हणतो, ऐकना अरुंधती "आय लव्ह यू". पण आशुतोषची आई बाजूला असल्याने अरुंधती लाजते आणि नंतर विषय बदलते.
अरुंधती आशुतोषला 'आय लव्ह यू' म्हणणार का?
आशुतोष अरुंधतीला एकदा 'आय लव्ह यू' म्हण असं सांगतो. त्यावर विषय बदलत अरुंधती म्हणते,"शिरा करत आहे. मग वेलदोडे सापडत नव्हते. तुम्हाला शिरा पाठवू का शिरा.. आणि तेच ते... त्यानंतर आशुतोषची आई जोरात म्हणते, मी जाते. म्हण तू तुला काय आय लव्ह यू वगैरे बोलायचं असेल तर. त्यानंतर अरुंधती आशुतोषचा फोन कट करते. त्यामुळे आता अरुंधती आशुतोषला "आय लव्ह यू" म्हणणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्वीस्ट; अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
