Karuna Sharma Full PC : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : शर्मा
Karuna Sharma Full PC : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : शर्मा
Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case) क्रौर्याची परिसिमा गाठणारे फोटो समोर आले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसून येत आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती.देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर आरोपींनी लघवी केली. हत्येचा घटनाक्रम समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता यावर करुणा शर्मा (karuna Sharma) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
करुणा शर्मा म्हणाल्या की, आज महाराष्ट्राला न्याय मिळेल. मी एक फोटो बघितला की, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्यावर तोंडावर लघवी करत आहे. या लोकांची काय मानसिक स्थिती आहे? हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडिओ काढत आहेत. वाल्मिक कराड तो व्हिडिओ लाईव्ह बघत आहे. आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे? त्यांनी जी लघवी केलेली आहे ती संतोष देशमुख यांच्या तोंडावर नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर लघवी केलेली आहे. एका मृत व्यक्तीची अशी अवस्था हे लोक करू शकतात तर एका जिवंत व्यक्तीची हे लोक काय अवस्था करतील.
















