South Suspense Thriller Movie: जन्मदाता बाबच निघाला हैवान... 'या' सस्पेन्स-थ्रिलर फिल्मनं वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिसही गाजवलं, 'बाहुबली 2'लाही पछाडलं
South Suspense Thriller Movie: साऊथमधील या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटानं 'बाहुबली 2' ला जोरदार टक्कर दिली. चीनमध्ये या चित्रपटानं एसएस राजामौली आणि प्रभासच्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. चीनमध्ये तब्बल 100 कोटींचा गल्ला केला आहे.
South Suspense Thriller Movie: भारतीय चित्रपटांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यातल्या त्यात चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपट पाहिले जातात. म्हणूनच 'अंधाधुन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सध्या भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला आहे. त्यातल्या त्यात एका साऊथच्या मूव्हीची चर्चा चीनमध्ये खूपच आहे. इतकी की, या चित्रपटानं बाहुबली 2 (Bahubali 2) ला देखील मागे टाकलं आहे. हा चित्रपट म्हणजे, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा 'महाराजा' (Maharaja) चित्रपट. या चित्रपटानं भारतात उत्तम कलेक्शन केलं आणि त्यानंतर या चित्रपटानं चीनचं बॉक्स ऑफिस गाजवलं.
'महाराजा' हा 2024 चा चित्रपट आहे, ज्यामध्ये अनुराग कश्यपनं खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निथिलन स्वामिनाथन यांनी केलं आहे. भारतात या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. आणि नंतर जेव्हा तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याचं खूप कौतुकही झालं. आजही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. त्याचं बजेटही फक्त 20 कोटी रुपये होतं. हा चित्रपट तमिळमध्ये बनवण्यात आला होता, त्यानंतर तो अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला.
View this post on Instagram
सस्पेंस थ्रिलर फिल्म 'महाराजा'
'महाराजा' एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊन 21 दिवस झाले. या 21 दिवसांत त्यानं बाहुबली 2 ला मागे टाकलं आहे. म्हणजे प्रभास आणि एसएस राजामौली यांचा चित्रपट आता 'महाराजा'च्या मागे आहे. आतापर्यंत विजय सेतुपतीच्या चित्रपटानं चीनमध्ये 76.50 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. याचाच अर्थ लवकरच 'महाराजा' चीनच्या बॉक्स ऑफिसवर कमाईची सेन्चुकी करेल, असंच दिसतंय.
'महाराजा'नं बाहुबली 2 ला पछाडलं
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या बाहुबली 2 नं चिनी बॉक्स ऑफिसवर 64 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर 'महाराजा'नं अवघ्या 21 दिवसांत 76.50 कोटी रुपये कमावले आहेत.
'महाराजा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'महाराजा' नं भारतात सुमारे 72 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात 165 कोटी रुपयांची कमाई करून ब्लॉकबस्टरचा किताब मिळवला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :