एक्स्प्लोर

Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : 'अशी ही बनवाबनवी-2' येणार? सचिन पिळगावकर यांनी स्पष्टच सांगितले, ''हा चित्रपट...''

Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू असते. आता, यावर दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भाष्य केले आहे.

Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेल्या चित्रपटांचा सिक्वेल येत असतो. सिक्वेलची ही बाब सिनेसृष्टीत  फारशी नवी नाही. मराठीतही काही चित्रपटांचे सिक्वेल झाले आहेत.  मराठी सिनेसृष्टीत काही एव्हरग्रीन चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई  केली आहेच, शिवाय आजही हे चित्रपट पाहताना धमाल येते. अशा काही चित्रपटांच्या सिक्वेलची प्रतीक्षा चाहत्यांना आहे. मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' ( Ashi Hi Banwa Banwi) या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू असते. आता, यावर दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी भाष्य केले आहे. 

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे या चौकटीने प्रेक्षकांना खळखळवून हसवले.  सिद्धार्थ रे  यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून  सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. व्ही. शांताराम यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले. आजही या चित्रपटाचे डायलॉग चांगलेच प्रसिद्ध आहेत. यातील काही सीन हे मीम टॅम्पलेट होऊन लोकांचे मनोरंजन करतात. 

'अशी ही बनवाबनवी'च्या सिक्वेलची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. आता, यावर दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी थेट भाष्य केले आहे. सचिन पिळगावकर यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत 'अशी ही बनवाबनवी'च्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. सचिन यांनी म्हटले की, हा सिनेमा लक्ष्याशिवाय नाही बनू शकत. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील नाही आहे. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे 'अशी ही बनवाबनवी'च्या टीममधील अनेक लोक आज आपल्यात नाहीत. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर सिनेमा पुढे जाऊ शकत नाही, असे भावूक उत्तर त्यांनी दिले. 

सचिन यांनी पुढे म्हटले की, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा चित्रपट मी बनवलाय, असं मी म्हणूच शकत नाही. हा चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला. आणि लोकांनी तो मोठा केला, असेही सचिन यांनी नमूद केले. 

'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट एका हिंदी सिनेमावर आधारीत होता. बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाला तरी मराठी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, लीलाबाई काळभोर, विजू खोटे आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget