Pushpa 2 Box Office Collection Day 8: 'पुष्पा 2'नं RRR आणि KGF 2 ला पछाडलं; मोडीत काढले मोठमोठे रेकॉर्ड; आतापर्यंतचा टोटल गल्ला किती?
Pushpa 2 Box Office Collection Day 8: पुष्पा 2 नं एकापाठोपाठ एक बॉलिवूड आणि साऊथचे अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं आता आणखी दोन मोठ्या चित्रपटांचे, दोन मोठे रेकॉर्ड मोडले आहेत.
Pushpa 2 Box Office Collection Day 8: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या 'पुष्पा 2 द रुल' (Pushpa 2: The Rule) या चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office) खळबळ उडवून दिली आहे, पुष्पा 2 नं एकापाठोपाठ एक भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व बड्या चेहऱ्यांच्या, दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड धुळीत मिळवले. आता फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपच शिल्लक आहेत, ज्यांचे विक्रम पुष्पा 2 येत्या काही दिवसांत मोडू शकतो. जाणून घेऊयात, पुष्पा 2 नं 7 दिवसांत कितीचा गल्ला केला?
पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2चं वादळ आलंय आणि या वादळात अनेक दिग्गजांचे चित्रपच गुरफटलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या चित्रपटानं रिलीजच्या केवळ सात दिवसांतच भल्या भल्या दिग्गजांना आणि त्यांच्या चित्रपटाला पछाडलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 नं रिलीजच्या एक दिवस आधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अनेकांना पाणी पाजलं आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पुष्पा 2 नं एक दिवस आधी 10.65 कोटी रुपये कमावले होते.
दिवस | कलेक्शन (रुपयांमध्ये) |
पहिला दिवस | 164.25 |
दुसरा दिवस | 93.8 |
तिसरा दिवस | 119.25 |
चौथा दिवस | 141.5 |
पाचवा दिवस | 64.45 |
सहावा दिवस | 51.55 |
सातवा दिवस | 43.35 |
आठवा दिवस | 37.40 |
टोटल | 725.75 |
वर टेबलमध्ये 8 दिवसांचे सुरुवातीचे आकडे देण्यात आले आहेत. यामध्ये फेरबदल होऊ शकतो. फायनल आकडे आल्यानंतर फिल्मच्या टोटल कलेक्शनमध्ये बदल होऊ शकतो.
पुष्पा 2, RRR आणि KGF चॅप्टर 2 च्या आधी कमावले 700 कोटी
पुष्पा 2 नं रिलीजच्या 8 व्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या प्रकरणातही या चित्रपटानं विक्रम केला आहे. यापूर्वी, सर्वात जलद 700 कोटी रुपये ओलांडणारे RRR आणि KGF 2 होते, ज्यांनी रिलीजच्या 17 व्या दिवशी 700 कोटींचा टप्पा ओलांडला होता. आता पुष्पा 2 नं अवघ्या 8 दिवसांत म्हणजेच, दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत फक्त आणि फक्त अर्ध्या दिवसांत हा आकडा पार केला आहे.
View this post on Instagram
पुष्पा 2 चं बजेट आणि स्टारकास्ट
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 ला जवळपास 500 कोटींचं भांडवलं लागलं आहे. फिल्ममध्ये अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना या दोघांव्यतिरिक्त फहाद फासिल देखील दमदार भूमिकेत दिसला आहे. चित्रपट 2021 ची सुपरहिट फिल्म पुष्पा 2 का सीक्वल आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :